Udayan Raje Bhosale  Sakal
पुणे

"...मग मी शिवसेना माझीच म्हणायला पाहिजे"; उदयनराजेंचा संताप

"शिवसेनेत बंड झालं का? मला माहित नाही"; असंही उदयनराजे म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला. शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर आहे. अशातच आता भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलंय. शिवसेना माझीच असं मी म्हणायला पाहिजे, असं ते का म्हणाले? जाणून घ्या.

उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेतल्या बंडाविषयी विचारलं असता शिवसेनेत बंड झालंय का, मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

शिवसेना भाजपा सरकार आहे, असं उदयनराजे म्हणाल्यावर शिवसेना कोणाची असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, "कोणाची म्हणजे काय? आता शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालीय मग काय मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. मग माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्रसुद्धा माझाच म्हटला पाहिजे. पण महाराष्ट्र हा लोकांचा आहे, लोकांमधून, जनतेतून आम्ही निवडून येतो. छत्रपतींचा महाराष्ट्र हा जनतेचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT