Shrinivas Pawar criticize RSS wants to end name Sharad Pawar politics  Sakal
पुणे

RSS ला शरद पवार हे नाव संपवायचे आहे; श्रीनिवास पवार यांनी प्रथमच आपली भूमिका केली स्पष्ट

ज्या साहेबांनी चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा म्हणायचे काकांनी माझ्यासाठी काय केले.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : ज्या साहेबांनी चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा म्हणायचे काकांनी माझ्यासाठी काय केले. असा काका मला असता तर मी सुद्धा खुश झालो असतो. ही बीजेपी ची चाल आहे.

आर एस एस ला शरद पवार हे नाव संपवायचे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार व भाजपवर हल्ला चढवत साहेबांची वय आता ८३ झाले आहे.

या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. मला काही व्यक्ती म्हणाल्या आता येथून पुढची वर्षे दादांची आहेत साहेबांची नाहीत, हा विचार मला वेदना देऊन गेला. पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही, यासारखा नालायक माणूस नाही, अशा रोखठोक शब्दात त्यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली

काटेवाडी येथे रविवारी (ता. १७) रात्री ग्रामस्थांसोबत श्रीनिवास पवार यांनी संवाद साधला. यावेळी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार उपस्थित होत्या. श्रीनिवास पवार पुढे म्हणाले, काटेवाडीकरांना वाटले असेल मी दादांच्या विरोधात इथे कसा आलो.

काळ चांगला असो अथवा वाईट मी कायमच दादांच्या सोबत राहिलो. त्यांनी जे काही निर्णय घेतले त्यांना मी साथ दिली. त्यांचा भाऊ म्हणून मी त्यांनी सांगेल तशी उडी मारली. परंतु ज्यावेळी आमची चर्चा झाली तेव्हा मी दादांना म्हणालो, 'आमदारकीला तू आहेस खासदारकी तरी आपण साहेबांकडे दिली पाहिजे साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत.'

ज्यांना कुणाला पहिल्या दिवसापासून पदे मिळाली ती केवळ साहेबांमुळेच मिळाली. त्याच साहेबांना आता आपण म्हणायचे कीर्तन करा आता घरी बसा. ते मला पटले नाही. मी काही राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही.

आपण औषध घेतो त्याची एक्सपायरी डेट असते तशी काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. आता माझी वय 60 आहे मला दाबून जगायचे नाही. जगायची तर ताट मानेने व स्वाभिमानाने जगायचे आहे. केवळ कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे हे बरोबर नाही. मला नाही वाटत त्यांना सुद्धा झोप येत असेल.

भाजपने साहेबांना संपवायचा खूप खूप प्रयत्न केला. घरातला कोणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही हे इतिहासामध्ये देखील आहे. घर एक असेल तर ते संपू शकत नाही. घरातला माणूसच घरच्यांना घाबरत नाही. माझे हे बोलणे रेकॉर्डिंग करत असाल तर मला देणे घेणे नाही. तुम्ही कोणाला पाठवायचे ते पाठवा. मी कुणालाही घाबरत नाही.

मी कुणाकडेही लाभार्थी म्हणून जाणार नाही. मी इथून पुढे मनमोकळेपणाने बोलणार आहे. साहेब जर दहा वर्षांपूर्वीचे असते त्यांनी काय केले असते हे तुम्हाला हे ठाऊक आहे. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका. मधली जी आमची पिढी आहे ती जरा लाभार्थी झाली आहे. तरुण पोरं मात्र हा म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचे ते, असे श्रीनिवास पवार म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

तर आपण त्याच्याकडून कारखाना काढून घेऊ शर्मिला पवार यांची मिस्कील टिप्पणी....

यावेळी ग्रामस्थांनी देखील साहेब म्हणतात, मी म्हातारा झालो नाही. यावर श्रीनिवास पवार म्हणाले बरोबर आहे. माझ्या पिढीतीलच माणसे लांबचा विचार करून लाभार्थी बनत आहे. मात्र तरुण मुले म्हणतात बघू आमचा आम्ही काय असेल ते करू.

परंतु साहेबांसोबत राहू. साहेबांना एवढी वर्ष राजकारणात झाली. त्यांनी कधी कुणाला आवाज चढवून बोलले नाही. कधी कोणाचा बाप काढला नाही. त्यांनी प्रत्येकाला आदर दिला. फक्त मधील २५ वर्षात येथील राजकारण दुसऱ्यांवर सोपवलं कारण ते दिल्लीत होते.

जर माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवला आणि वीस वर्षांनी मी तिथे गेलो तर तेथील वॉचमनच मला आत मध्ये सोडत नाही तर मी काय करू असे श्रीनिवास पवार म्हणतात शर्मिला पवार यांनी त्यांना मध्येच थांबवत आपण तो कारखाना त्याच्याकडून काढून घेऊ अशा मिस्कील शब्द टिप्पणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी देखील हसून दाद दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT