लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजलयं. अशात सत्तेत आणि विरोधी पक्षामध्ये युती आघाडीच्या राजकारणावरून आता जागावाटपासाठी वाद सुरु आहे. या सगळ्यात आता महाविकास आघाडीतून मावळच्या जागेवर ठाकरे गटाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभेच्या निवडणूकीस शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने असणार आहे.
म्हणजेच मावळच्या जागेसाठी शिंदे गटाचे सद्याचे खासदार श्रीरंग बारणेंच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या जागेसाठी अजित पवार गट आग्रही देखील होता. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वत: अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार या जागेवरून उभे होते मात्र, त्यावेळी संपुर्ण शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी पवारांच्या मुलाचा २ लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता.
महत्वाचे म्हणजे या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे. कारण मावळमध्ये पुण्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ तसेच रायगडमधील पनवेल, कर्जत, उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी, मावळचे आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत. तर रायगड जिल्हा हा तटकरेंचा बालेकिल्ला आहे. पण तरीही बारणेंसाठी पवार गटाला या जागेवरून हात धुवावे लागले.
आता मावळसाठी मविआकडून ठाकरे गट लढणार म्हटल्यावर बारणेंविरोधात तिथे ठाकरे गटाला मातब्बर उमेदवार द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी ठाकरेंनी जूना खिलाडी आखाड्यात उतरवलाय आणि त्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नावाची चर्चा आहे. नुकताच वाघेरे यांनी ठाकरेंची भेट घेतली. एवढंच नाही आपल्या मावळातील दौऱ्यादरम्यान जयंत पाटलांनी वाघेरेंची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आल आहे. त्यामुळे आता भाजपचा खिलाडी उतरवून ठाकरे शिंदेच्या उमेदवाराची कोंडी करणार एवढं मात्र नक्की आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.