pune sakal
पुणे

पुणे ते लडाख - श्वेताची यशस्वी बाईक सफर

साहसी प्रवासात आम्ही ही कुठे कमी नसू हे महिला सशक्तिकरणाचे उदाहरण श्वेताने जगासमोर मांडले

रमेश मोरे

जुनी सांगवी : बालपणी आई बाबांनी खेळण्यामधील हातात दिलेली खेळणी व त्यांचे कुतूहल सर्वांनाच असते. पुढे आपल्याही मुलीला बाईक, कार चालवायला यावी अशी आई बाबांची ईच्छा असते. अशीच ईच्छा मनात बाळगून जुनी सांगवी येथील यशवंत चित्रोडे व आई रेखा चित्रोडे यांनी त्यांची कन्या श्वेता चित्रोडे हिस दहावीत असताना मोटार सायकल हाती दिली. आणी आज ती या क्षेत्रात उत्तम बाईक रायडर बनली आहे.

जुनी सांगवी येथील श्वेता चित्रोडे हिने पुणे ते लडाख व लडाख ते पुणे असा दुचाकीवर प्रवास करून पुरूषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या साहसी बाईक रायडींग क्षेत्रात ऊन, वारा, पाऊस झेलत या साहसी प्रवासात आम्ही ही कुठे कमी नसू हे महिला सशक्तिकरणाचे उदाहरण जगासमोर मांडले आहे. श्वेता हिच्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीने पिंपरी-चिंचवड शहरातून तिचे कौतुक होत आहे. श्वेताने २१ दिवसात ६२२७ हजार किलोमीटरचा प्रवास करत पुणे ते लडाख व लडाख ते पुणे असा बाईक प्रवास यशस्वी केला आहे.

जुनी सांगवी येथील रहिवासी असलेल्या श्वेता चित्रोडे हिला बालपणापासून बाईक रायडिंगचे आकर्षण आहे. इयत्ता दहावी मध्ये वडिलांची बाईक चालवण्याचा अनुभव पुढे तिने ॲडव्हेंचर छंद म्हणून जोपासला. जगाला निसर्ग वाचवा,पर्यावरण जपण्याचा संदेश देते.तिने याआधी पुणे ते गोवा, महाबळेश्वर असे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बाईक प्रवास केला आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील भटकंती करताना निसर्गाची जपणूक करण्याचा संदेश देत तिने अनेक किल्ले,दुर्ग विविध शहरांतील ठिकाणे अशी भटकंती केली आहे. बाईक रायडिंगचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाऊ आशिष याची मदत तर वडील यशवंत व आई रेखा यांचे प्रोत्साहन या क्षेत्रात महत्त्वाचे ठरले आहे असे श्वेता सांगते.

श्वेताने लडाख कुच करण्यासाठी पुण्यातून तिच्या केटीएम ३९० या बाईकने ९ ऑगस्ट रोजी प्रस्थान केले. महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर असा प्रवास करत लडाख येथील पेंगोंग लेक येथे १६ ऑगस्टला पोहोचले. या बाईक प्रवासात लडाखमध्ये सहापेक्षा जास्त उंच प्रदेश पार केले. श्वेताने भारतातील कारगील आणि बटालिक सेक्टर मधील अंडरमन आणि या शेवटच्या गावात जाऊन आपली उपस्थिती लावल्यानंतर लेहमध्ये तिला तिचे इतर बाईक रायडर सामील झाले.

श्वेता ही केटीएम ३९० या एडवेंचर बाईक वरून प्रवास करणारी पिंपरी-चिंचवड मधील पहिली महिला आहे. परतीच्या वेळी लडाख, उत्तर प्रदेश, चंदीगड, मध्य प्रदेश व महाराष्ट्र असा प्रवास करत एकूण दहा राज्य व दोन केंद्रशासित प्रदेश या बाईक चालकांनी पादाक्रांत केले. ३० ऑगस्ट रोजी श्वेता व तिचे सहकारी सुशांत देशमुख,हरिश नाईक, मंजुनाथ नाईक, राहुल भौमिक, या मित्रांसह लडाख ते पुणे, जुनी सांगवी असा परतीचा प्रवास केला.

आपल्यादौऱ्यात तिने पर्यावरण, पृथ्वी व निसर्ग वाचविण्यासाठी संदेश देत हा प्रवास पुर्ण केला. या यशस्वी प्रवासाबद्दल येथील प्रशांत शितोळे मित्र परिवार व समस्त सांगवीकर नागरिकांच्या वतीने श्वेता व सहका-यांचा पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT