Siddhesh Thorat won in star pravah  sakal
पुणे

पारगावचा सिद्धेश थोरात टिव्हीवर 'झळकला' , या मालिकेत ठरला विजयी

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

Pune Latest Update: आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील सिद्धेश रामदास थोरात हा नवोदित कलाकार स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार जोडी नं.१ मध्ये उपविजेता ठरल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.

मी होणार सुपरस्टार जोडी नं.१ या शो च्या जुन मध्ये झाले अंतिम फेरीत सिद्धेश थोरात व ऋतिका जमादार ची जोडी उपविजेती ठरली आहे. त्यांना सन्मानचिन्ह व चार लाख रुपयांचा धनादेश बक्षीस देण्यात आले. सिद्धेश थोरात ने मिळवलेल्या या यशाबद्दल पारगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्वेता ढोबळे व उपसरपंच नितीन ढोबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच बबनराव ढोबळे, संतोष लबडे, काळूराम लोखंडे, विवेक चव्हाण, सुरेखा ढोबळे, लता ढोबळे, गणेश ढोबळे, भाऊसाहेब ढोबळे, अशोक धोब्लेर, निखील दातखीळे, प्र्साद्धोब्ले, संतोष बढेकर, तुषार थोरात, स्वाती भूमकर, मनीषा ढोबळे, मंगळ ढोबळे, ग्रामसेवक के.डी. भोजणे आदी उपस्थित होते.

सिद्धेशने बीसीए मध्ये पदवी संपादन केल्यानंतर नृत्य कलेत आवड असल्याने त्याने क्लासिकल भरत नाट्यम शिकला लावणी किंग आशिष पाटील यांच्या चंद्रा गाण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला अमृता खानविलकर यांनी सिद्धेश बरोबर चंद्रा गाण्यावर नृत्य करून बनवलेल्या रील ला इन्स्टाग्राम वर लाखो चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

सिद्धेश ने सहभाग घेतलेल्या ग्रुप ला थायलंड मध्ये झालेल्या आयआयजीएफ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळाळे आहे.

सिद्धेश मुलगा असुनही लावणीवर उत्कृष्ठ नृत्य करतो विठाबाई यांच्या लावणीवरील नृत्यासाठी सिद्धेश व ऋतिका या जोडीला प्रसिध्द नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर यांनी मानाचे गुरुचे घुंगरू देऊन चे विशेष कौतुक केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT