pune metro and pmp bus sakal
पुणे

Metro and PMP : मेट्रो अन् पीएमपीसाठी एकच तिकिटाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांना पोहचण्यासाठी पीएमपीच्या फिडर बससेवेचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे ३०० इ-बस भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेट्रो आणि पीएमपीसाठी एकच तिकीट असणार आहे. त्याबाबतचा निर्णय उद्या (ता. ३१) पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

शहरातील मेट्रोच्या मार्गाचे वनाज ते रूबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय या दरम्यान सेवा सुरू झाली. या दोन्ही मार्गावर दैनंदिन प्रवाशांची संख्या ३५ हजारापर्यंत गेली आहे. या दोन्ही मार्गांवर सात स्थानकासाठी सध्या पीएमपीची एका तासाला एक बस अशी फिडर सेवा सुरू करण्यात आली आहे.

पण बसची वारंवारिता कमी असल्याने त्याचा लाभ मर्यादित आहे. मेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी स्थानकाच्या चार किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पीएमपीची बस सेवा उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन केले जात आहे.

पुणे महापालिकेकडून १५व्या वित्त आयोगातून महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निधी मिळाला आहे. त्यातून सात मीटर रुंदीच्या ३०० इ बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट असावे यादृष्टीने महामेट्रोने ‘पुणे कार्ड’ सुविधा सुरु केली आहे. याचा वापर सध्या मेट्रोसाठी केला जात आहे. याच कार्डचा वापर पीएमपी बससाठी केल्यास फिडर सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना दरवेळी तिकीट न काढता एकाच तिकिटात प्रवास करता येणार आहे अशी घोषणा यापूर्वी झालेली आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत येणार आहे.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘मेट्रो स्टेशनच्या चार किलोमीटरच्या परिघात पीएमपीच्या फिडरसेवेचा विस्तार करण्यासाठी महापालिका ३०० इ बस भाड्याने घेत आहे. या बस उपलब्ध झाल्यानंतर पीएमपी व मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकच तिकीट लागणार आहे. त्यासाठी पीएमपीएच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT