Sinhagad no entry at night love couple nuisance tourists Forest department set up check post at Kondhanpur  sakal
पुणे

Pune News : सिंहगडावर रात्रीच्या वेळी आता 'नो एन्ट्री'; प्रेमी युगुल ,इतर उपद्रवी पर्यटकांवर चाप

घाटरस्त्यावरील कोंढणपूर फाट्यावर वनविभागाने उभारला तपासणी नाका; 'सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर वन विभागाने केली कार्यवाही

निलेश बोरुडे

सिंहगड : सिंहगडाच्या घाट रस्त्यावर कोंढणपूर फाटा येथे वन विभागाने तपासणी नाका सुरू केल्याने बंदी असताना रात्रीच्या वेळी सिंहगडावर जाणाऱ्यांवर आता आळा बसला आहे. रात्री अपरात्री प्रेमी युगुल व इतर व्यक्ती बिनदिक्कत सिंहगडावर जात असल्याबाबत 'सकाळ'ने वन विभागाचे लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने कार्यवाही करत हा तपासणी नाका उभारला असून रात्रंदिवस या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सिंहगडाच्या घाट रस्त्यावर पायथ्याशी गोळेवाडी येथे वन विभागाचा जुना तपासणी नाका आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कर्मचारी तैनात नसल्याने किंवा काही वेळा कोंढणपूर, खेडशिवापूर अथवा इतर गावांची नावं सांगून प्रेमी युगुल किंवा इतर उपद्रवी पर्यटक थेट सिंहगडावर जात होते.

याबाबत सकाळ'ने वन विभागाचे लक्ष वेधल्यानंतर गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर रात्रपाळीसाठी कर्मचारी नेमण्यात आले होते मात्र आजूबाजूच्या गावांतील नागरिकही हा रस्ता वापरत असल्याने नियंत्रण ठेवण्यात मर्यादा येत होत्या.

त्यामुळे कोंढणपूर फाटा तेथे कायमस्वरूपी तपासणी नाका उभारावा असे सकाळ'च्या वतीने सुचविण्यात आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करत अद्ययावत तपासणी नाका उभारला आहे.

कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी कक्ष तयार केला असून सोलर यंत्रणेद्वारे याठिकाणी कायमस्वरूपी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तिन्ही बाजूंच्या रस्त्यांकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून या नाक्यामुळे रात्रीच्या वेळी सिंहगडावर जाणाऱ्यांवर पूर्णपणे आळा बसला आहे.

"गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावरील गेट बंद केल्यानंतर कोंढणपूर, खेडशिवापूर व इतर गावांतील स्थानिकांची गैरसोय होत होती. कोंढणपूर फाटा येथे तपासणी नाका उभारल्याने रात्रीच्या वेळी स्थानिकांची होणारी गैरसोय थांबली आहे. तसेच रात्रीच्या वेळी गडावर जाणाऱ्यांवरही आळा बसला आहे."

नवनाथ पारगे,माजी जिल्हा परिषद सदस्य,डोणजे.

"सायंकाळी साडेसहा ते सात वाजल्यानंतर कोंढणपूर फाट्यावरून गडाकडे जाणारे गेट बंद करण्यात येते. याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारीही तैनात करण्यात आले असून सोलर पॅनल बसवून विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परिसरावर नियंत्रण राहील असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सकाळ'ने सुचविल्यानुसार उपयुक्तता लक्षात घेऊन सुमारे दहा लाख रुपये खर्चून तातडीने हे काम करण्यात आले आहे."

प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT