Bridge Damage sakal
पुणे

Bridge Damage : सिंहगड रस्त्यावरील डीआयएटी जवळील पूलाला भगदाड; संरक्षक भींतीचाही ढासळला आधार

खडकवासला धरणाला लागून असलेल्या डीआयएटी जवळील पूलाचा भराव घसरल्याने भगदाड पडले असून संरक्षक भींतीचाही आधार ढासळल्याने सध्या सदर पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.

निलेश बोरुडे

सिंहगड - सिंहगड रस्त्यावरील खडकवासला धरणाला लागून असलेल्या डीआयएटी जवळील पूलाचा भराव घसरल्याने भगदाड पडले असून संरक्षक भींतीचाही आधार ढासळल्याने सध्या सदर पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.

परंतु पर्यायी रस्ता नसल्याने या धोकादायक पूलावरुन स्थानिकांसह हजारो पर्यटकांची ये-जा सुरू असून या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी या पूलाचा किरकोळ स्वरूपात भराव खचला होता त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करुन मूळ कामाकडे दुर्लक्ष केले परिणामी सध्या अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

या पूलाच्या दोन्ही बाजूंना रस्त्याचे काम झालेले असल्याने रस्ता रुंद आहे मात्र त्या तुलनेत पूल अत्यंत अरुंद असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी भराव खचलेल्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरुन ठेवली होती.

13 डिसेंबर 2022 रोजी रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने या गोण्यांवरुन घसरुन कठड्यावर आदळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पूलाचे मंजूर असलेले काम करुन घेण्याकडे दुर्लक्ष केले. सध्या पाऊस सुरू असल्याने पूलाचा मोठा भाग पडून भगदाड पडले आहे.

तसेच संरक्षक भिंतीच्या खालचा आधारही ढासळल्याने भींत अधांतरी आहे. सिंहगड, पानशेत भागातील अनेक गावांसाठी हा एकमेव रस्ता असल्याने व पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

'अगोदरच हा पूल अत्यंत अरुंद असल्याने दोन वाहने आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आता एका बाजूने भराव व पूलाचा आधार ढासळल्याने भगदाड पडले आहे. पाऊस सुरू असताना वाहन चालकास अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.'

- निलेश जावळकर, नागरिक, खानापूर.

'अनेक दिवसांपासून या पूलाचा थोडा थोडा भाग खचत होता तेव्हाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. सध्या अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण?'

- पूजा पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्या, डोणजे.

'पूलाचा भराव ढासळला आहे त्या ठिकाणी वाहनचालकांना अंदाज यावा म्हणून तातडीने बॅरिकेड्स लावून घेण्यात आले आहेत. या पूलाच्या कामासाठी नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याबाबत कार्यवाही केली जाईल.'

- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT