Accused Arrested Sakal
पुणे

Crime News : ग्रामसेवकाचे फील्मी स्टाइलने अपहरण करून खंडणी उकळणारा आरोपी पोलीसांच्या जाळ्यात

'मला माहिती आहे तुम्हाला वडापाव आवडतो, तुमची शेवटची इच्छा म्हणून तुम्हाला वडापाव खाऊ घालतो आणि मग तुम्हाला विष पाजून मारतो'.

निलेश बोरुडे

'मला माहिती आहे तुम्हाला वडापाव आवडतो, तुमची शेवटची इच्छा म्हणून तुम्हाला वडापाव खाऊ घालतो आणि मग तुम्हाला विष पाजून मारतो'.

सिंहगड - खडकवासला धरणाला लागून असलेल्या कुडजे (ता. हवेली) या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत 73 हजार रुपये खंडणी उकळून फरार झालेल्या विकास प्रकाश गायकवाड (वय-38, रा. कुडजे, ता. हवेली) या मुख्य आरोपीस पुणे शहर पोलीसांच्या उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

आरोपी विकास गायकवाड याने दोन अल्पवयीन साथीदारांसह 26 एप्रिल 2023 रोजी ग्रामसेवक महेशकुमार खाडे (वय 39) यांचे अपहरण केले होते.

आरोपी विकास गायकवाड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून दि. 26 एप्रिल रोजी सायंकाळी ग्रामसेवक महेशकुमार खाडे आपल्या कारमधून जात असताना कुडजे गावच्या हद्दीत अगोदर गायकवाडने कारपुढे बियरची बॉटल फोडून गाडी अडवली.

त्यानंतर खाडे यांच्याशी हुज्जत घातली व वाद मिटविण्याचा बहाना करून जबरदस्तीने निर्जन ठिकाणी बंद असलेल्या हॉटेलवर नेले.

तेथे आरोपी गायकवाडने खाडे यांचे हातपाय बांधून विष पाजून मारण्याची धमकी देत 73 हजार रुपये गुगल पे द्वारे ट्रान्स्फर करुन घेतले. तसेच आणखी दीड लाख रुपये आणून देण्याची जबदस्ती करत मोबाईल व कारची चावी काढून घेतली होती. (Latest Marathi News)

घाबरलेल्या ग्रामसेवक खाडे यांनी पैसे आणून देतो म्हणत गायकवाडच्या तावडीतून सुटका करून घेतली. सुरुवातीला त्यांनी याबाबत कोणालाही सांगितले नाही.

परंतु गायकवाडने आणखी दीड लाख आणून देण्यासाठी तगादा लावल्याने व कुटुंबालाही मारण्याची धमकी दिल्याने खाडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी गांभीर्याने तपास करत दोन अल्पवयीन गुन्हेगारांना व ते पुरवणाऱ्या आरोपीला अटक केली. विकास गायकवाड मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला कात्रज येथून अटक केली आहे.

रेकी करुन अपहरण.....

सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विकास गायकवाड याने ग्रामसेवक महेशकुमार खाडे यांची पूर्ण माहिती काढली होती. एवढेच नाही तर गुन्हा करण्यासाठी जाणीवपूर्वक अल्पवयीन साथीदारांची त्याने निवड केली होती.

'मला माहिती आहे तुम्हाला वडापाव आवडतो, तुमची शेवटची इच्छा म्हणून तुम्हाला वडापाव खाऊ घालतो आणि मग तुम्हाला विष पाजून मारतो' असे गायकवाड हातपाय बांधल्यानंतर खाडे यांना म्हणत होता. यावरुन त्याने गुन्हा करण्यापूर्वी ग्रामसेवक खाडे यांची पूर्ण रेकी केली होती.

'तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीने कट रचून हा गुन्हा केल्याचे दिसून येत असून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.' (Marathi Tajya Batmya)

- दादाराजे पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर.

'पुणे शहर पोलिसांनी वेगाने तपास करुन मुख्य आरोपीला अटक केली आहे. संबंधित ग्रामसेवकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.'

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT