Sinhgad Road sakal
पुणे

Sinhgad Road : प्रतीक्षा चातकासारखीच... पण रस्तेदुरुस्तीची

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असमान मार्ग आणि त्यातच खड्डे अशी दुरवस्था कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असमान मार्ग आणि त्यातच खड्डे अशी दुरवस्था कायम आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक मॉन्सूनची नव्हे तर रस्तेदुरुस्तीच्या कामाची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत.

या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधला जात आहे. आत्तापर्यंत हे काम ४५ टक्केच पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलासाठी ७१ पिलर उभारले जाणार असून त्यापैकी ७० पिलरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पुढील काळात पिलरवर गर्डर टाकणे, रॅम्पचे काम करणे यास प्राधान्य दिले जाणार आहे.

उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असेल तरी रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीवरून जाणारे वृद्ध, गरोदर महिला, रुग्णवाहिकांमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असले तरीही त्याखालील रस्ता सुस्थितीत असलाच पाहिजे अशी भूमिका ‘सकाळ’ने सुरवातीपासून घेतली आहे.

विठ्ठलवाडीचा सिग्नल, संतोष हॉल, ब्रह्मा व्हेज ते गोयलगंगा चौक या टप्प्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या भागात डांबर टाकून खड्डे बुजविल्यानंतर मोबाईल कंपन्यांसह इतर विभाग प्रकल्प विभाग व पथ विभागाला पूर्वकल्पना न देता रस्ता खोदत आहेत व त्याची दुरुस्ती न करता कामगार निघून जात आहेत. त्यामुळे खड्डे वाढत आहेत.

रस्त्यावर खडी पसरून ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी होते. त्यातच रस्ता खराब असल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

गड येणार पण सिंहगड रोड मार्गे नाही!

‘जी २०’ परिषदेसाठी येणारे परदेशातील प्रतिनिधी सिंहगडावर जाणार आहेत. त्यांच्यासाठी नेहमीच्या सिंहगड रस्त्याऐवजी लांबचा पण चांगला रस्ता निवडण्यात आला आहे. पाषाण, बावधन, चांदणी चौक, वारजे, शिवणे, खडकवासला या मार्गे हे अधिकारी सिंहगडावर जाणार आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सुशोभीकरण व रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. सिंहगड रस्ता मात्र तसाच उपेक्षित राहिला आहे.

सिंहगड रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता चांगला केला जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेतच, तसेच या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT