Piped Natural Gas esakal
पुणे

Natural Gas : सव्वासहा लाख पुणेकरांची पाइप नॅचरल गॅसला पसंती

घरात आणि वाहनांचा ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) कडून गॅस पुरवठा करण्यात येत आहे.

सनील गाडेकर

पुणे - सातत्याने गॅसचा पुरवठा, सिलिंडरच्या तुलनेत स्वस्त पर्याय आणि पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कोणतीही प्रक्रिया करावी लागत नसल्याने पाइप नॅचरल गॅसचा (पीएनजी) वापर करण्यास पुणेकरांची पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरात पीएनजी वापरणाऱ्यांची संख्या सव्वासहा लाखांच्या पुढे गेली आहे.

एक लाख चार हजार घरांमध्ये २०२२-२३ मध्ये पीएनजीची जोडणी झाली होती. तर २०२३-२४ मध्ये हा आकडा एक लाख २० हजार झाला आहे. एवढेच नव्हे तर सीएनजी वाहनांचा देखील इंधनाचा वापर वाढला आहे. घरात आणि वाहनांचा ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) कडून गॅस पुरवठा करण्यात येत आहे.

यामुळे वाढतोय पीएनजीचा वापर

  • अखंडित गॅसपुरवठा

  • सिलिंडर नोंदणीची प्रक्रिया करावी लागत नाही

  • डिलिव्हरीमॅनची वाट पाहावी लागत नाही

  • सिलिंडर गॅसच्या तुलनेत स्वस्त

  • पर्यावरणास अनुकूल आणि वापरण्यास सुरक्षित

  • जितका वापर, तेवढेच बिल (दर दोन महिन्यांनी)

पीएनजीच्या दरात झालेले बदल (प्रतिमानक घनमीटरमध्ये)

  • ७ एप्रिल २०२३ पर्यंत : ५७ रुपये

  • १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत : ५१.३० रुपये

  • सध्या असलेले दर : ४९.९० रुपये

पुणे आणि पिंपरीत पीएनजी नेटवर्कमध्ये मोठी वाढ होत आहे. २०२३-२४ मध्ये एमएनजीएलने एक लाख २० हजारांहून अधिक कुटुंबांना पीएनजी पुरवला आहे. स्थिर किंमत, पायाभूत सुविधांमुळे पीएनजीच्या वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे.

- संजय शर्मा, संचालक, एमएनजीएल

आमच्यासाठी पीएनजीचा पुरवठा होत आहे. सिलिंडरच्या तुलनेत हा गॅस वापरणे परवडतो. मुख्य म्हणजे सिलिंडर बुक करणे आणि टाकी येण्याची वाट पाहणे हा प्रकार पाइप गॅसच्या जोडणीनंतर थांबला आहे. गॅसचे दरही कमी झाले आहेत.

- रूपाली सारखे, पीएनजी वापरकर्ते

नवीन कनेक्शन वाढविणार

एमएनजीएलच्या नवीन कनेक्शनची संख्या गेल्या दोन वर्षांमध्ये दरवर्षी एक लाखांच्या पुढे आहे. येत्या पाच वर्षांमध्ये यात मोठी वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे एमएनजीएलकडून कळविण्यात आले.

  • सहा लाख २५ हजारांहून अधिक घरांत गॅस पुरवठा

  • पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण आणि तळेगाव ‘एमएनजीएल’कडून पुरवठा

  • ४ लाख ४० हजार वाहने ‘पीएनजी’कडून सीएनजी पुरवठा

  • १२० सीएनजी स्टेशन

  • २ हजार ३०० किमी पाइपलाइनद्वारे सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: मुंबई इंडियन्सने 'या' अनकॅप्ड खेळाडूसाठी वापरलं एकमेव RTM कार्ड

SCROLL FOR NEXT