Leopard sakal
पुणे

Leopard : सहा बिबट्यांच्या झुंजीने थरकाप; डरकाळ्यांनी परिसरात दहशत

विठ्ठलवाडी परिसरात बिबट्यांचा थरार

सकाळ वृत्तसेवा

आपटाळे - विठ्ठलवाडी (ता. जुन्नर) येथील ढगाडवाडी ठाकर वस्ती येथे शुक्रवारी (ता. १७)रात्रीच्या सुमारास जवळपास सहाहून अधिक बिबट्यांमध्ये डरकाळ्या फोडत झुंज झाली. कानठळ्या बसविणाऱ्या बिबट्यांच्या डरकाळ्या अनुभवल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विठ्ठलवाडी येथील ढगाडवाडी या ठाकर वस्तीच्या जवळ असलेल्या डोंगरावर बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान बिबट्यांच्या जोरदार डरकाळ्यांचा आवाज वस्तीवर आला. या वस्तीच्या नजीकच जवळपास सहाहून अधिक बिबटे झुंजत होते.

त्यांच्या डरकाळ्यांच्या आवाजाने वस्तीमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले. जुन्नर ते तांबे रस्त्यावर ही वस्ती असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची, तसेच नागरिकांची वर्दळ असते. बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिक भयभीत झाले.

वारुळवाडीत बिबट्याकडून कुत्र्याचा पाठलाग

नारायणगाव : वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील आनंदवाडी येथे भरवस्तीत शुक्रवार (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे यांच्या कांदळी येथील बंगल्याच्या आवारात गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या शोधात दोन बिबटे आले होते.

त्यापैकी एक बिबट्या बंगल्याच्या दरवाजासमोर बसलेला दिसत असून, दुसरा बिबट्या भक्ष्याचा शोध घेत आहे. हे बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाले आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरु असताना भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करत आनंदवाडी येथील सुरेश फुलसुंदर यांच्या घरासमोरील ओट्यावर बिबट्या आला. ओल्या फरशीवरून बिबट्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. भटके कुत्रे पळून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT