पुणे : फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा आधार घेत नव्या शिक्षण धोरणाचा अवलंब करणाऱ्या पुण्याच्या 'द अकॅडमी स्कुल'च्या एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकवण्याचा पराक्रम केला आहे. वयाच्या सहाव्या वर्षी रसायनशास्त्राच्या आवर्त सारणी (Periodic Table) मधील सगळ्या ११८ घटकांचं वाचन फक्त ५४ सेकंदात करत तनुष निलपवार या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (International Book of Records)ने त्याला 'सुपर टॅलेंटेड किड' ही पदवी बहाल केली आहे.
रसायनशास्त्राचा पाया मानल्या जाणाऱ्या आवर्त सारणीत ११८ रसायनांचा आणि त्यांच्यातील परस्परसंबंधांचा समावेश असतो. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तनुषने फक्त ५४ सेकंदांत या सारणीतील ११८ घटकांचं वाचन करण्याचा विक्रम केला. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याच्या या पराक्रमाची नोंद करण्यात आली. त्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये देखील इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच तनुषची स्मरणशक्ती अविश्वसनीय असल्याची पावतीही त्यांनी दिली.
तनुषची स्मरणशक्ती उत्तम आहे, हे आम्हालाही जाणवलं होतं. असे कलागुण किंवा अशी प्रतिभा असलेले विद्यार्थी खूप कमी असतात. त्यांच्या प्रतिभेला फुलण्यासाठी पोषक वातावरण आम्ही द अकॅडमी स्कुलमध्ये पुरवतो. यात शिक्षकांची भूमिकाही मोलाची असते. विद्यार्थ्याच्या कलाने आणि त्याच्या कलेचा आदर करत शिक्षकांनी त्याला घडवलं, तर तनुषसारखे अनेक विद्यार्थी घडतील, अशी प्रतिक्रिया द अकॅडमी स्कुलच्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.