Panchnama Sakal
पुणे

बेरोजगार तरुणाईच्या हाताला मिळाले काम

‘मला गुलाबजाम करायचे आहेत. त्यात गुलाब किती टाकू,’ असा प्रश्न प्रांजलीने फेसबुकवर विचारला.

सु. ल. खुटवड

‘मला गुलाबजाम करायचे आहेत. त्यात गुलाब किती टाकू,’ असा प्रश्न प्रांजलीने फेसबुकवर विचारला. त्यानंतर अनेक मुले कामधंदा टाकून, गुलाबजाम कसे करायचे, यावर मार्गदर्शन करू लागले. त्यातील अनेकांना साधा चहाही कधी केला नसेल पण अतिशय आत्मीयतेने व आत्मविश्वासाने गुलाबजामची रेसिपी त्यांनी सांगितली. एकाने तर घरचे व बाजारचे गुलाबजाम यांच्यातील फरकासह त्यांचे फायदे-तोटे यांच्यावर एक मोठा प्रबंध सादर केला. दुसऱ्या एका सिंगल मुलाने ‘हा पदार्थ बनविण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी स्वतःच तयार करून घेऊन येतो, फक्त पत्ता इनबॉक्समध्ये पाठव, असे सांगितले.

‘माझी आई खूप चांगले गुलाबजाम बनवते आणि तिला तरुण मुलींना पदार्थ करायला शिकवायला खूप आवडते. उद्या सकाळी मी घरीच आहे, त्यावेळी तू आमच्या घरी ये. आपण सविस्तर बोलू. की मीच तुझ्या घरी आईला घेऊन येऊ?’ असा प्रश्न केला. आठशे मुलांनी ही पोस्ट लाइक केली तर साडेसहाशे मुलांनी कमेंट दिल्या. दुसऱ्या दिवशी प्रांजलीने ‘आज मला खूप कंटाळा आलाय. काय करू?’ असा प्रश्न विचारला आणि चोवीस तास फेसबुकवर पडीक असणाऱ्यांनी तिच्या प्रश्नाला भरभरून दाद दिली.

‘कंटाळा घालवण्यासाठी काय केले पाहिजे इथपासून कंटाळा येऊच नये, यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा साडेआठशे कमेंट्स तिला आल्या. त्या वाचता-वाचताच तिला कंटाळा आला. काडीचंही काम न करणाऱ्यांनी कामात मन गुंतवत राहा, असा सल्ला दिला. गेल्या पाच वर्षांत अवांतर वाचनासाठी पुस्तकाचे एक पानही न वाचलेल्यांनी ‘ग्रंथ हेच खरे गुरु. वाचनाची आवड जोपास. आयुष्यात तुला कधीही कंटाळा येणार नाही’ असा सल्ला दिला.

प्रांजलीने एकदा सहज ‘पाऊस कोसळतोय’ एवढी पोस्ट टाकली. त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. काहींनी चित्रपटातील गाण्यांची आठवण करुन दिली. तर कोणी दुसऱ्यांनी फॉरवर्ड केलेल्या कविता आपल्याच म्हणून खपवल्या. पावसात भिजू नकोस, आजारी पडशील, असा काळजीयुक्त सल्लाही काहींनी दिला. तर काहींनी बाहेर पडताना छत्री, रेनसूट घेऊनच बाहेर पड, असंही सांगितले. काहींनी आपण दोघांनी एकत्र पावसात भिजल्यास काय मजा येईल ना, असे चित्र रंगवले. एकदा रात्री दहा वाजता प्रांजलीने ‘मला झोपच येत नाही. काय करू? एखादे अंगाई गीत सुचवा?’ अशी पोस्ट टाकली. त्यावर तरुणाईच्या अक्षरशः उड्या पडल्या. प्रांजलीला झोप येणं, ही आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून अनेकजण कामाला लागले. झोप येत नसल्यास आयुर्वेदाच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, असा सल्ला काहींनी दिला तर झोप येण्यासाठी काहींनी उपाययोजना सांगितली. बऱ्याचशा मुलांनी हिंदी-मराठीतील अनेक अंगाई गीते सांगितली. काहींनी तर स्वतःच ती म्हणून दाखवण्याची तयारी दर्शवली.

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ हे अंगाई गीत तर दोनशे वीस जणांनी सुचवले.

‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या गाण्याची फर्माईश दीडशे जणांनी केली.

‘नीज माझ्या नंदलाला,’ ‘बा नीज गडेऽ ऽनीज माझ्या लडिवाळा’ अशी अनेक गाणी चार-पाचशे जणांनी सुचवली. काहींनी ‘धीरे से आजा रे अखियन मे निंदिया’ अशी हिंदी गाणीही सांगितली. अंगाई गीते सुचवण्याचा सिलसिला पहाटे साडेतीनपर्यंत चालला. रात्री दहा वाजता पोस्ट टाकून लगेच झोपी गेलेल्या प्रांजलीने आपल्याला झोप यावी म्हणून पहाटेपर्यंत जागे राहणाऱ्या साडेआठशे तरुण मुलांचे आभार मानले व ‘सकाळी उठल्यानंतर मन प्रसन्न राहण्यासाठी कोणती गाणी ऐकावीत’ अशी पोस्ट टाकून संबंध तरुणाईला पुन्हा कामाला लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT