Panchnama Sakal
पुणे

आमची ॲमिनिटी स्पेस, निकालात काढली ‘केस’

‘हा काय प्रकार आहे? येथून आम्हाला उठा म्हणून सांगणारे तुम्ही कोण? कालच आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात तालिबान्यांचा निषेध केला आहे.

सु. ल. खुटवड

‘हा काय प्रकार आहे? येथून आम्हाला उठा म्हणून सांगणारे तुम्ही कोण? कालच आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारात तालिबान्यांचा निषेध केला आहे. आम्ही तालिबान्यांना घाबरत नाही तर तुम्हाला घाबरू होय? मुळीच नाही. आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो. या तुमच्या अरेरावीसंदर्भात आम्ही आजच पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे.’’ जनुभाऊंनी चार-पाच जणांना चांगलेच सुनावले.

सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत जनुभाऊंसह चार-पाच ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तीन-चार तेथे आले व ‘ही जागा आमच्या साहेबांनी तीस वर्षांच्या भाडेकरारावर घेतली आहे. तुम्ही येथून उठा’, असे म्हणू लागले. ‘‘पण ही जागा ॲमिनिटी स्पेस असून, येथे बागेचे आरक्षण आहे.’’ असं जनुभाऊ व त्यांच्या मित्रांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती लोकं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.

‘आमच्या साहेबांना तुम्ही ओळखत नाही. टेंडर भरायच्या आत कंत्राट त्यांना मिळालेलं असतं. आतासुद्धा ‘‘ह्या...ह्या...ॲमेनिटी स्पेस माझ्या,’’ असं नुसतं त्यांनी बोटांनी दाखवलंय. पुढं बघा सगळी यंत्रणा कशी कामाला लागते. आमच्या साहेबांचा लई वट आहे. त्यांच्या इच्छेशिवाय महापालिकेचा दरवाजा बी उघडत नाय.’’ गॉगल घातलेल्या एकाने फुशारकी मारत म्हटले.

‘अच्छा! म्हणजे तुझे साहेब महापालिकेत ‘डोअरकीपर’ आहेत तर!’’ जनुभाऊंनी असं म्हणताच एकच हशा पिकला. त्यावर साहेबांची माणसं कावरी-बावरी झाली.

‘आता तुमचं खूप बिल झालं. मुकाट्यानं निघायचं.’’ दाढीवाल्या गृहस्थाने बाहेर हात दाखवत म्हटलं.

‘बिलाची काळजी करू नका. आम्ही सगळं बिल भरू. त्या समोरच्या टपरीवाल्याला विचारा. आम्ही त्याचंही बिल कधी थकवत नाही.’’ जनुभाऊंनी असं म्हणताच पुन्हा हशा पिकला.

‘तुम्ही काय आमची चेष्टा चालवली काय?’’, दाढीवाल्या गृहस्थाने म्हटले.

‘साहेब, चेष्टेची सुरवात तर तुम्हीच केलीय. मग आम्ही माघार कशाला घेऊ.’’ जनुभाऊंनी जशास तसे उत्तर दिले.

‘महापालिकेची इलेक्शन तोंडावर आली आहे. त्यामुळे साहेबांनी आम्हाला सबुरीनं घ्यायला सांगितलंय. सर्वसामान्यांशी प्रेमानं बोलायला सांगितलंय. म्हणून आम्ही गप्प आहे. नाहीतर...’’ त्यातील एकाने दम भरला. त्यावर मात्र जनुभाऊ चांगलेच भडकले.

‘तुम्ही आम्हाला सरळ सरळ दमदाटी करताय. या ॲमिनिटी स्पेसला स्वतःची जहागिरी समजू नका. आता तर आम्ही येथून जागचं हलणार नाही. इतकंच काय पण या धोरणाविरुद्ध आमरण उपोषण करणार.’’ असं म्हणून सगळ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर वाद वाढतच गेला. हा सगळा प्रकार कळताच साहेबांचा कार्यकर्त्यांना फोन आला. ‘प्रकरण वाढवू नका. आपल्या अंगलट येईल. मिटवून टाका’. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जनुभाऊंपुढे सपशेल माघार घेतली.

‘समोरच्या टपरीतून चहा मागवा पण बिल आम्ही भरू कारण आम्ही कोणाचेही बिल थकवत नाही. त्याचबरोबर आम्ही कोणाच्या रुपयालाही मिंधे नसतो. त्यामुळेच आम्ही कोणाविरुद्धही ताठ मानेने लढू शकतो.’’ जनुभाऊंनी भाषण ठोकले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पळत पळत जाऊन चहा आणला.

‘‘बरं आम्ही आता निघू का?’’ कार्यकर्त्यांनी विचारले.

‘असं कसं निघणार? आधी लेखी माफीनामा द्या. नाहीतर उद्या परत कोणाला दमदाटी कराल.’’ जनुभाऊंनी खडसावले. मग नाइलाजाने त्यांनी तसं लिहून दिलं. मग काय जनुभाऊंनी माफीनाम्यांची झेरॉक्स काढून, ‘सर्वसामान्यांची ताकद’ असं शीर्षक देत जागोजागी ती चिटकवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT