Panchnama Sakal
पुणे

पंचनामा - मेव्हणीसाठी मेव्हणा मरे फणसात ना मिळे गरे...!

‘दाजी, तुम्ही म्हणजे फणसासारखे आहात. बाहेरून काटे आणि आतून गोड गऱ्यासारखे. आमची ताई खरंच भाग्यवान आहे,’ सुषमाने असं म्हटल्यावर महेशच्या अंगावर मोरपीस फिरविल्यासारखं झालं.

सु. ल. खुटवड

‘दाजी, तुम्ही म्हणजे फणसासारखे आहात. बाहेरून काटे आणि आतून गोड गऱ्यासारखे. आमची ताई खरंच भाग्यवान आहे,’ सुषमाने असं म्हटल्यावर महेशच्या अंगावर मोरपीस फिरविल्यासारखं झालं. मेव्हणीने असं कौतुक केल्यावर कोणत्या पुरुषाला आवडणार नाही? सुषमा कालच तीन-चार दिवसांसाठी तिच्या ताईकडे राहायला आली होती. त्यात सहज गप्पा मारता मारता तिने फणसाची उपमा महेशला दिली. त्यावर मानसीने तोंड फिरवले. ‘हं. तोंड बघा. फक्त तोंडच फणसासारखं आहे. ओबड धोबड.’ असं ती पुटपुटली. एकूणच नवऱ्याचे कौतुक कोणत्याही परस्त्रीने केले तरी बायकोला ते आवडत नाही, हेच खरं! मग ती परस्त्री स्वत:ची बहीण असली म्हणून काय झालं. ‘ता’ म्हटले की ताकभात हे महेशने बरोबर ओळखलं. सुषमाला फणसाचे गरे खायचे आहेत, हे त्याने ओळखले. मेव्हणीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे, हे आपले कर्तव्य आहे, या पुरुषांच्या कॅट्यागिरीतला तो असल्याने तो तातडीने मोठी पिशवी घेऊन मार्केट यार्डला रवाना झाला. मात्र, पद्मावतीजवळ त्याची गाडी पंक्चर झाली. मग पंक्चरचे दुकान शोधत तो गाडी ढकलत नेऊ लागला. कडक उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. हात दुखू लागले.

मात्र, मेव्हणीला फणसाचे गरे खाऊ घालायचेच, या निर्धारापुढे हा त्रास फिका पडला. अखेर दीड किलोमीटरवर त्याला पंक्चरचे दुकान दिसले. पंक्चर काढल्यानंतर मार्केट यार्डमधील फणस विभागात तो पोचला. ‘हमारी मेव्हणी के लिए एक गोड फणस चाहिए. कितना भी महाग चलेगा. लेकीन खराब नही होना चाहिए’ महेशने म्हटले. त्यावर विक्रेता म्हणाला, ‘साहेब, मराठीतनं बोला की राव! तिकडल्या ढिगातनं कोणता बी घ्या. पण एकदा विकलेला माल परत घेणार नाही, सांगून ठेवतो.’ मग एका ढिगाऱ्यातून महेशने भला मोठा फणस निवडला. ‘दोनशे रुपये.’

विक्रेत्याने म्हटले. ‘काही कमी करा की’ आपल्या मध्यम वर्गाला जागत महेशने म्हटले. ‘आमच्याकडे फिक्स रेट असतो. कमी-जास्त होत नसतं. घ्यायचा असेल तर घ्या.’ विक्रेत्याने असे म्हटल्यावर महेशने त्याच्या हातावर दोनशे रुपये टेकवले. घरी आल्यानंतर गॅलरीत परात व मोठा चाकू घेऊन तो फणस कापायला बसला. हाताला चीक चिकटू नये म्हणून पेलाभर गोडेतेलही त्याने घेतले. ‘सुषमा, फक्त अर्धा तास थांब. नंतर मस्तपैकी गोड गोड गरे खा,’ असे म्हणून तो कामाला लागला. बऱ्याच ठिकाणी चाकू खुपसू लागला. अनेक प्रयत्नांनंतर फणस कापण्यात त्याला यश आले. पण सगळा पांढराच काप निघू लागला. एकही गरा मिळाला नाही. त्यातच हाताबरोबरच सगळ्या अंगाला

चीक लागल्याने तो वैतागून गेला. तेवढ्यात सुषमा व मानसी गॅलरीत येऊन त्यांनी सगळा प्रकार बघितला. ‘गरे कोठे आहेत?’ मानसीने विचारले. ‘अगं, एकही गरा मिळाला नाही’ खाली मान घालून महेशने उत्तर दिले. ‘आपल्याला एखादे काम जमत नसेल तर करू नये. उगंच कशाला फुशारक्या मारायच्या?’ असे म्हणत मानसी मोठ्याने हसली. त्यावेळी महेशने सुषमाकडे केविलवाण्या नजरेने पाहत हा अपमान गिळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT