Panchnama Sakal
पुणे

Panchnama : पेंडन्सी अगदी झिरो तपासातला मी हिरो!

खऱ्याची दुनियाच राहिली नाही. आपण कितीही काबाड-कष्ट करा. वरिष्ठांच्या पायी निष्ठा वाहा. त्यांच्या कितीही पुढं पुढं करा पण मलईदार पोस्टिंगवर दुसऱ्याचीच वर्णी लागणार.

सु. ल. खुटवड

खऱ्याची दुनियाच राहिली नाही. आपण कितीही काबाड-कष्ट करा. वरिष्ठांच्या पायी निष्ठा वाहा. त्यांच्या कितीही पुढं पुढं करा पण मलईदार पोस्टिंगवर दुसऱ्याचीच वर्णी लागणार.

खऱ्याची दुनियाच राहिली नाही. आपण कितीही काबाड-कष्ट करा. वरिष्ठांच्या पायी निष्ठा वाहा. त्यांच्या कितीही पुढं पुढं करा पण मलईदार पोस्टिंगवर दुसऱ्याचीच वर्णी लागणार. मी चोवीस तासात लिंबू-मिरच्या चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केलं. पण माझ्या कर्तबगारीची कोणीही दखल घेणार नाही, याची खात्री आहे. पाकिटं पोचवणाऱ्यांचीच सध्या चलती आहे.

काल सुधीर कापसे या इसमाने लिंबू-मिरच्यांची चोरीची फिर्याद दाखल केल्यानंतर लगेचच मी आरोपींच्या शोधात बाहेर पडलो. नुसत्या नजरेने आरोपींना शोधण्याची दिव्यदृष्टी मला लाभली आहे पण आमच्या खात्याला आहे का कौतुक? सिग्नल लागल्यानंतर तीन-चार जण गाडीचालकांना लिंबू-मिरची विकत असल्याचे मला दिसले. पंचनाम्यातील मुद्देमालाच्या वर्णनाशी ते विकत असलेल्या चीजवस्तू जुळत असल्याने मी त्यांना दमात घेतलं.

मात्र, तिघेही गयावया करू लागले. संशयित आरोपींना कधीही दया-माया दाखवायची नसते, हा माझा नियम आहे. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यावर आणले. पोलिसी हिसका दाखवल्यावर मात्र ते कबूल झाले. निरपराध व्यक्तीलाही पोलिसी हिसका दाखवल्यानंतर ते दरोड्याचाही गुन्हा कबूल करतात, असा माझा अनुभव आहे. मागंही एका दरोडाप्रकरणाचा फारच गाजावाजा झाला व मला वरिष्ठांनी धारेवर धरले होते. त्यावेळी मी आरोपी नगर जिल्ह्यातून मागवले होते. तेथील अधिकारी माझा बॅचमेट असल्याने तो माझ्या मदतीला धावला. त्याने चोरीप्रकरणात पकडलेले पाच जण आमच्या पथकाकडे सोपवले. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपींना मी पकडतोच, अशी माझी ओळख आहे, ती काय उगाच नाही. ‘झिरो पेंडन्सी’ हे माझ्या कामाचे वैशिष्ट्ये आहे पण वरिष्ठांना कदरच नाही.

हल्ली आमच्या खात्यात प्रामाणिकपणा आणि विश्‍वासार्हता राहिली नाही. जप्त केलेल्या वस्तू कोणी घरी नेतं का? मला तर असला प्रकार अजिबात आवडत नाही. परवा दरोड्यातील मुद्देमालातील सोन्याची अंगठी आमच्या सहकाऱ्याने लंपास केली. मी जाब विचारल्यावर त्याने मला दुसरी अंगठी काढून दिली. घरी बायकोला ती दाखवल्यावर ती एकदम खूष झाली. असं सारखं सारखं करणं चांगलं नाही. एकदिवस अंगलट येईल, असा सल्ला मी सहकाऱ्याला दिला.

लिंबू-मिरच्यांच्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पंचनाम्यातील मुद्देमाल बाजूला काढून ठेवल्यावरही टोपलीभर लिंबू-मिरच्या शिल्लक होत्या. त्या फेकून देणं मला जड गेलं. मग मी सगळी टोपली घरी घेऊन आलो. सोसायटीच्या वॉचमनला एक लिंबू फुकट दिलं. गरिबांच्या मदतीला धावणं, मला नेहमी आवडतं. महागडी लिंबं व मिरच्या पाहून बायको खूष झाली. तिनं चार-पाच लिंबांचा सरबत केलं. शेजाऱ्यांना वाटून, आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन केलं. मी बायकोला काही बोललो नाही. उलट शेजारधर्म पाळला पाहिजे, असं मी तिला सांगितलं.

सायंकाळी दोन लिंबं घेऊन, एका हॉटेलमध्ये गेलो व दहा ग्लास सरबत कर, असं सांगितलं. तो सरबत मी मंदिराशेजारी बसणाऱ्या भिकाऱ्यांना दिला. समाजसेवेला मी नेहमीच प्राधान्य देतो. आपल्या पदरात काहीतरी पुण्य जमा झालं पाहिजे, या मताचा मी आहे. एवढं सगळं कमवून काय वर न्यायचं आहे का? दानधर्म केला पाहिजे. सरबत वाटतानाचे फोटो फेसबुकवर टाकून, दोनशे कमेंट व पाचशे लाईक मिळवल्या.

ता. क. - लिंबू-मिरच्यांच्या चोरांना चोवीस तासात पकडल्यामुळे मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा, असा बायकोनं हट्ट धरलाय. तिचा हट्ट पुरवणं माझं कर्तव्य आहे. फक्त त्यासाठी वरिष्ठांना मोठं पाकीट द्यावं लागेल. देऊन टाकू. पैशांच्या मोहजालात आपण अडकायचं नाही, असं मी ठरवलंय.

(रस्त्याशेजारील एका कुंडीत कागदाचा हा बोळा आम्हाला सापडला आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT