Panchnama Sakal
पुणे

Panchnama : उपोषण झाले आमरण कारण मात्र विनाकारण!

‘मी काय बहिरा-बिहिरा आहे का? तुम्ही माझ्याशी आवाज चढवून बोलू नका. बायको सोडून मी कोणाचंही या पट्टीत ऐकत नाही. तुम्ही आधी आवाज खाली घ्या.

सु. ल. खुटवड

‘मी काय बहिरा-बिहिरा आहे का? तुम्ही माझ्याशी आवाज चढवून बोलू नका. बायको सोडून मी कोणाचंही या पट्टीत ऐकत नाही. तुम्ही आधी आवाज खाली घ्या.

‘मी काय बहिरा-बिहिरा आहे का? तुम्ही माझ्याशी आवाज चढवून बोलू नका. बायको सोडून मी कोणाचंही या पट्टीत ऐकत नाही. तुम्ही आधी आवाज खाली घ्या. नाहीतर मी बेमुदत उपोषणाला बसेल.’ जांबुवंतरावांनी लिंबूविक्रेत्याला इशारा दिला.

‘मी रोज याच आवाजात बोलतो. मी जर ‘प्लीज लिंबू घ्या.’ असं कुजबुजत म्हटलं तर दिवसभरात माझं एकतरी लिंबू विकलं जाईल का? ‘लिंबं घ्याऽऽऽऽ लिंबंऽऽऽऽऽऽऽऽ’ या आवाजाच्या पट्टीतच मला ओरडावं लागतं.’ विक्रेत्यानं म्हटलं.

‘लिंबं घ्याऽऽऽ’ असं ओरडणं वेगळं आणि ‘वीस रूपयांत सहा लिंबं घ्यायची असेल तर घ्या नाहीतर फुटा’ असं खेकसत म्हणणं, या दोन्हींतील फरक मला चांगला कळतो. तुम्ही मला अपमानास्पद बोलला आहात. त्यामुळे तुम्ही आधी माझी माफी मागा. नाहीतर मी बेमुदत उपोषण करीन.’ जांबूवंतरावांनी म्हटले.

आज सकाळी मार्केटयार्डमध्ये लिंबं घेऊन बसणाऱ्या व्यक्तीचा आणि जांबूवंतरावांचा सामना झाला होता.

‘लिंबं कशी दिलीत?’ या जांबुवंतरावांच्या सलामीच्या वाक्याने त्यांच्यातील खडाजंगीला सुरवात झाली होती.

‘उतरून टाकायला की रात्रीची उतरावयाला हवीत.’ लिंबूविक्रेताही वाकड्यात शिरला.

‘त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? महावितरणच्या बिलासारखं तुमच्या लिंबांचे दर वेगवेगळे आहेत का?’ जांबुवंतराव उखडले.

‘सरबताची लिंबं, दारावर किंवा गाडीवर लटकावयाची लिंबं आणि उतरून टाकायची लिंबं वेगवेगळी असतात. त्यानुसार त्यांची किंमत ठरते.’ लिंबूविक्रेत्याने माहिती दिली.

‘सरबतासाठी हवी आहेत. चांगल्या दर्जाची द्या.’ जांबुवंतरावांनी म्हटले. त्यानंतर विक्रेत्याने सहा लिंबांची किंमत वीस रुपये सांगितली.

‘एवढी महाग कशी काय? आमच्या कोपऱ्यावरचा भाजीवालाही याच रेटमध्ये देतो. मार्केटयार्डमध्ये लिंबं स्वस्त मिळतात म्हणून मी दहा किलोमीटर अंतर पार करून, खास लिंबं खरेदीसाठी आलोय. दहा रूपयांत सहा लिंबं द्या.’ जांबुवंतरावांनी म्हटले. त्यावर विक्रेता चिडला.

‘दहा रूपयांत सहा लिंबं हवी असतील तर तुम्ही पावसाळ्यात या.’ विक्रेत्याने म्हटले.

‘मग आम्ही सरबत काय पावसाळ्यात प्यायचा का? घरी आलेल्या पाहुण्यांना ‘सरबतासाठी पावसाळ्यात या’ असं म्हणायचं का? तर्कसंगतीनुसार बोला.’ जांबुवंतरावांनी म्हटले. त्यावेळी विक्रेता चिडला.

‘वीस रूपयांत सहा लिंबं घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर फुटा.’ असं जोरात म्हणाला. त्यावर मात्र जांबूवंतराव चिडले.

‘तुम्ही माझ्याशी सभ्य भाषेत बोला. ग्राहकांचा अपमान केल्याबद्दल मी तुम्हाला कोर्टात खेचेन.’ असा इशारा दिला.

‘सहा लिंबांसाठी तुम्ही कोर्टात जाणार आहात का? खुशाल जा. तुमच्या धमक्यांना मी भीक घालत नाही.’ विक्रेत्याने असं म्हटल्यावर जांबुवंतरावांनी आपले उपोषणास्त्र बाहेर काढले. लाकडाला बांधलेल्या पुठ्ठ्यावर त्यांनी ‘ग्राहकाचा अपमान करणाऱ्या लिंबूविक्रेत्याचा निषेध’ ‘आमरण उपोषण’ असे खडूने लिहिले व पिशवीतून चटई काढून, लिंबूविक्रेत्याशेजारी ठाण मांडून बसले. एखादा लिंबू खरेदी करायला आला, की जांबूवंतराव त्याला पुठ्ठ्यावरील मजकूर दाखवत असत. त्यामुळे लिंबं खरेदी करताना त्याची चलबिचल होत असे. त्यामुळे अनेकजण खरेदी न करता निघून जात. या साऱ्या प्रकारामुळे विक्रेताही वैतागला. थोड्यावेळात बरीच गर्दी जमा झाली. अनेकांनी जांबुवंतरावांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तर काहींनी लिंबूविक्रेत्याला माफी मागायला सांगून, या प्रकरणावर पडदा पाडायला सांगितला. विक्रेत्याने थोडे आढेवेढे घेत माफी मागितली.

त्या विक्रेत्याकडूनच पाच-सहा लिंबं घेत एकाने सरबत बनवला. दुसऱ्याने सरबताचा ग्लास जांबुवंतरावांना प्यायला दिला. जांबुवंतरावांनी लिंबूरस पित ‘उपोषण सुटलं’ असं जाहीर केले. त्यावेळी बाकीच्यांनी टाळ्यांचा गजर करत उरलेल्या सरबताचा आस्वाद घेतला. ‘दहा रूपयांत सहा लिंबं दिली असती तर ती परवडली असती. वेळेची आणि पैशांची खोटी तर टळली असती.’ लिंबूविक्रेता पुटपुटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT