smart city Sakal
पुणे

Pune News : स्मार्ट सिटीची तिजोरी रिकामी, महापालिका देणार निधी

स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शहरात ६५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे स्मार्ट सिटीची तिजोरी रिकामी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शहरात ६५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे स्मार्ट सिटीची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यामुळे या कामासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडे स्मार्ट सिटीने निधीची मागणी केली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज (शुक्रवारी) झाली. त्यात स्मार्ट सिटी कंपनीतर्फे महापालिकेकडे व शासनाकडे ६५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निधी दिला होता. त्याचे सुमारे ६५ कोटी रुपये व्याज स्मार्ट सिटीच्या बँक खात्यात जमा होते.

त्यातून बाणेर, बालेवाडी भागात विविध प्रकारची कामे करण्याची प्रक्रिया स्मार्ट सिटीने सुरु केली होती. पण केंद्र सरकारने हे व्याज परत घेतल्याने स्मार्ट सिटीच्या कामासाठी निधी शिल्लक नाही. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाने मदत करावी अशी मागणी स्मार्ट सिटी कंपनीने केली आहे. त्यास पुणे महापालिकेने तयारी दर्शविली आहे.

‘स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरु असलेल्या कामासाठी कंपनीकडे पुरेसा निधी नसल्याने कंपनीने महापालिका व राज्य सरकारने ६५ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे.’

- विक्रमकुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Ajit Ranade: डॉ. अजित रानडेंच्या हकालपट्टीचा निर्णय रद्द! गोखले इन्स्टिट्युटने न्यायालयात दिली माहिती

Gold-Silver Rate: चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा केला पार; सोने 81 हजारांवर, गुंतवणूक करावी का?

Latest Maharashtra News Updates Live : 25 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद

Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा स्वादिष्ट पनीर चीज हरभरा पॅटिस, आजच नोट करा रेसिपी

Share Market Today: सोन्या-चांदीत विक्रमी वाढ; जागतिक संकेत सुस्त, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

SCROLL FOR NEXT