Raju Shetti  sakal
पुणे

Raju Shetti : दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा;राजू शेट्टी यांची मागणी,आंबेगाव तालुक्यात शेतकरी मेळावा

प्रशांत पाटील

मंचर : ‘‘शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. कोणाचेही सरकार असो, शेतकऱ्यांसाठी लढा हेच आमचे कर्तव्यच आहे. शेतकऱ्यांची मागणी दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसला आहे. दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमचे काही खरे नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पिंपळगाव खडकी येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात शेट्टी बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, बाबाजी खानदेशी, प्रकाश कोळेकर, रामदास बांगर, रामनाथ बांगर, भूषण आवटे, मंगेश बोराडे आदी उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीमालाला व दुधाला बाजारभाव मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे. शेतीमालालाही योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकरी वर्गाने संघटित झाले पाहिजे. ’’

यावेळी प्रभाकर बांगर, संतोष पवार, तुकाराम गावडे, संतोष इंदोरे, सविता पोखरकर, दीपक पोखरकर, नवनाथ पोखरकर, स्वप्नील बांगर यांची भाषणे झाली. संदीप वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. पशुखाद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला योग्य बाजारभाव देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देताना अटी लावू नका. विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका. दूध दराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्यांना यापुढे दुधाने अंघोळ घालण्याचे आंदोलन करावे लागेल.

- राजू शेट्टी, माजी खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT