raj thackeray Sakal
पुणे

Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीत सध्या प्रचंड खालावली आहे. राजकारण्यांची भाषा प्रचंड खालच्या पातळीवर पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रात काय वाट्टेल ते सुरु आहे. काही नेते मंडळी तर जाळ्यांवर उड्या मारत आहेत. खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजे, अशा घणाघाती शब्दांत मनसे प्रमुख राज ठकारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावर आज पुण्यातील साहित्य परिषदेच्या कार्यालयात झालं. यावेळी राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, या समेमलानाच्या बोधचन्हाच्या निवडीसाठी, देशभरातून आलेली अनेक बोधचिन्ह माझ्याकडं पाठवण्यात आली होती. त्यातील राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह मला आवडलं आणि ते निवडावं असं सुचवलं. साहित्य संमेलन समितीने देखील ते स्वीकारलं.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

१) महाराष्ट्राची साहित्याची परंपरा उज्वल आहे. साहित्य संमेलन भरवणारे देखील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावं. खरंतर अशा कार्यक्रमात काय किंवा साहित्य संमेलनात काय राजकारण्यांना बोलवायची गरज नाही. साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं असंच असलं पाहिजे.

२) सध्या महाराष्ट्राची एकूणच परिस्थिती प्रचंड खालावली आहे, राजकारण्यांची भाषा तर प्रचंड खालच्या पातळीवर गेली आहे, अशा राजकारण्यांना साहित्यिकांनी चांगलच ठणकावलं पाहिजे.

३) महाराष्ट्रात सध्या वाट्टेल ते सुरु आहे. नेते जाळ्यांवर उड्या काय मारत आहेत, खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत.

४) देशाला विचार देणारा, दिशा देणारा आपला महाराष्ट्र होता, पण तो आज कुठल्या खालच्या थराला येऊन थांबला आहे? रोज सकाळी उठून वाट्टेल ते बोलणारे, वाट्टेल त्या भाषेत बोलणारे, राजकीय नेते दिसत आहेत. आणि महाराष्ट्राच्या या अधःपतनाला दूरचित्रवाणीच्या वाहिन्या पण तितक्याच जबाबदार आहेत.

५) आपण काहीही बोललो तरी ते दाखवलं जातं हे माहित असल्यामुळे हे नेते वाट्टेल ते बोलत सुटलेत. आज जी मुलं लहान आहेत, ज्यांना राजकारणात यायचं आहे अशा मुलांना वाटत राहणार, असं अद्वातद्वा, अर्वाच्य बोलणं म्हणजेच राजकारण. म्हणूनच साहित्यिकांनी राजकारण्यांचे कान धरले पाहिजेत आणि साहित्यिकांनी आपण ट्रोल होऊ याची भिती अजिबात बाळगू नये. तुम्ही बोललंच पाहिजे. साहित्य संमेलनं होतील, पुस्तकं येतील, आम्ही ती वाचत राहू, पण अशा प्रकारची साहित्यिक चळवळ उभी करावी लागेल की, ज्यातून राजकारणातील घसरणारी भाषा ही सुधारली पाहिजे.

६) साहित्यिकांनी राजकारण्यांना सांगायचं की, त्यांनी काय करावं आणि राजकारण्यांनी ते ऐकावं अशीच परिस्थिती असली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

Nashik Unauthorized Hoardings : शहराचे विद्रुपीकरण! वाहतूक बेटांवर फलकबाजी; वाहतुकीला अडथळा

MCAने २७ वर्षांनंतर Irani cup जिंकलेल्या मुंबई संघाला जाहीर केले १ कोटी रुपयांचे बक्षीस

Akola Incident: अकोल्यात दगडफेक अन् जाळपोळ, नंतर लाठीचार्ज, घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, थेट सरकारवर टीकास्त्र डागलं

SCROLL FOR NEXT