space for Bhimathadi jatra in Mumbai for fair Sharad Pawar pune sakal
पुणे

Sharad Pawar : भीमथडी जत्रेला मुंबईत जागा उपलब्ध करून देणार; शरद पवार

खासदार शरद पवार; भीमथडी जत्रेचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात गेल्या सोळा वर्षापासून सातत्याने भरणारी भीमथडी जत्रा आता केवळ पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. या जत्रेला आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. ही जत्रा आता पुण्याच्या सोबतच अन्य महानगरांमध्येही भरली पाहिजे. त्यामुळे या जत्रेसाठी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता.२४) बचत गटांच्या महिलांना दिले. यावेळी पवार यांनी भीमथडी जत्रेचे कौतुक केले.

बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व शारदा महिला संघाच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या भीमथडी जत्रेचे यंदा १६ वे वर्ष आहे. यानुसार यंदाची ही जत्रा बुधवारपासून सुरु झाली आहे. येत्या रविवारी (ता.२५) या यात्रेचा समारोप होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी शनिवारी सायंकाळी भीमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी त्यांनी जत्रेतील सर्व स्टॉलची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी बचत गटांच्या महिला आणि उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पवार म्हणाले, ‘‘या जत्रेत प्रामुख्याने महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती, परंपरा व जीवनशैलीचे दर्शन घडत असतं. यामध्ये राज्यभरातील महिला बचत गट सहभागी होतात. त्यामुळे भीमथडी जत्रेतील विविध कलाविष्कार पाहण्यासाठी आणि खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर मोठी गर्दी करत असतात. यंदाच्या या जत्रेला प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे या जत्रेचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका घेणारे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत.’’

‘कुस्ती परिषदेत दुर्दैवाने दोन गट’

दरम्यान, यावेळी कुस्ती परिषदेतील गटबाजीबाबत पवार यांना प्रश्‍न विचारला असता. दुर्दैवाने कुस्ती परिषदेत दोन गट पडले आहेत. हे सर्व खरे आहे. पण मी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांना घरी बोलावून हा विषय मिटवला आहे. या दोनपैकी दुसऱ्या गटाचीसुद्धा नगरला स्पर्धा घेण्याची इच्छा आहे. त्यावर त्यांनी मी आधी पुण्याची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्यवस्थित पार पाडू, असं म्हटलं आहे. त्यानंतर नगरच्या स्पर्धेचं बघू. परंतु पुण्याच्या कुस्ती स्पर्धेला हजर राहायचं की नाही, हे मी तारखा बघून ठरवेन, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT