पुणे

पुणे- मुंबईतून परराज्यांतील 5 मार्गांवर शुक्रवारपासून विशेष रेल्वेगाड्या

- मंगेश कोळपकर

पुणे : लॉकडॉऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे मध्य रेल्वेने अमृतसर, हजरत निजामुद्दीन, हटिया आदी पाच मार्गांवर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण खुले झाले असून ११ जूनपासून त्या सुरू होतील. (Special trains to 5 other States from Pune - Mumbai on routes from Friday)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर (गाडी क्र. 01057) ही १६ पासून सीएसटीवरून रोज रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी पोचेल. अमृतसरवरून ही गाडी (क्र. ०१०१५८) १९ जूनपासून रोज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री बारावाजता मुंबईत पोचेल. दादर, ठाणे, कल्याण, कसारा, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, सावदा, रावेर, बुरहानपूर, नेपानगर, खंडवा आदी स्थानकांवर ही गाडी थांबेल.

कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून हजरत निजामुद्दीन येथे जाण्यासाठी आठवड्यातून एकदा अतिजलद रेल्वे सुटेल. कोल्हापूरवरून ही गाडी (क्र. ०२०४७) दर मंगळवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. निजामुद्दीन येथून ही गाडी (क्र. ०२०४८) हजरत निजामुद्दीन येथून दर गुरुवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पोचेल. मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा आदी स्थानकांवर ही गाडी थांबेल.

पुणे - सांतरागाछी ही साप्ताहिक अतिजलद गाडी १२ ते २६ जूनदरम्यान सुटेल. ही गाडी (०२४९१) पुण्यातून दर शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी सुटेल व सांतरागाछी येथे तिसर्‍या दिवशी पहाटे ०५ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०२४९२) दर गुरूवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुटेल व पुण्यात तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पोचेल. दौंड, नगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर आदी स्थानकांवर ही गाडी थांबेल.

पुणे - हटिया ही विशेष साप्ताहिक गाडी (क्र. ८६१७) दर शुक्रवारी पुण्यातून सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी सुटेल व हटिया येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोचेल. तेथून ही गाडी (क्र. ०८६१८) दर बुधवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल व तिसऱ्या दिवशी पुण्यात सकाळी ०९ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचेल. दौंड, नगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला आदी स्थानकांवर ही गाडी थांबेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन विशेष गाडी (०१२२१) ११ जूनपासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, आणि शनिवारी धावेल. तर हजरत निजामुद्दीनवरून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी ही गाडी १२ जूनपासून दर बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून कन्फर्म तिकिट असणाऱ्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येईल, असे रेल्वेने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT