पुणे - पुण्यातून दिल्लीला (Delhi) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा (UPSC Exam) अभ्यास करणाऱ्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Student) खास लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) महापालिकेने (Municipal) आयोजित केली आहे. उद्या (बुधवारी) मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात सकाळी १० ते ५ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना युपीएससीचा अर्ज भरल्याचा पुरावा आवश्यक असणार आहे. दरम्यान, शहरात उद्या फक्त कोव्हॉक्सीनचे सहा ठिकाणी लसीकरण होणार आहे. इतर ठिकाणचे लसीकरण बंद असेल. (Special Vaccination Students Delhi Consolation Students Competitive Examination)
गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातून दिल्ली जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. पण कोरोनाच्या संसर्गामुळे हे विद्यार्थी अनेक दिवसांपासून पुण्यात आहेत. युपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार युपीएससीची पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी दिल्लीला जाणार असल्याने त्यांची तेथे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठी त्यांच्यासाठी खास पुढाकार घेतला आहे.
कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी सकाळी १०.०० ते सांयकाळी ०५.०० या वेळेत लसीकरण मोहीम होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह परीक्षेसाठी पात्र असल्याचे कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
कोव्हीशील्डचे लसीकरण बंद
महापालिकेकडील कोव्हीशील्ड लसीचा साठा संपल्याने बुधवारी शहरातील लसीकरण बंद असणार आहे. बुधवारी शासनाकडून लस उपलब्ध झाली तर गुरुवारचे नियोजन केले जाईल असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीनचे सहा ठिकाणी लसीकरण होणार आहे, प्रत्येक केंद्रावर ३०० डोस उपलब्ध केले आहेत. ज्या नागरिकांनी ३० जूनपूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशांना दुसरा डोस दिला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.