Marathon Competiition sakal
पुणे

एसआरटी मधील सिंहगड स्पर्धा साहिल नायर व वीणा जगनाडे यांचा प्रथम क्रमांक

पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत सिंहगड- राजगड- तोरणा(एसआरटी) अल्ट्रा ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील पहिला टप्प्यात सिंहगड स्पर्धेत साहिल नायर व वीणा जगनाडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत सिंहगड- राजगड- तोरणा(एसआरटी) अल्ट्रा ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील पहिला टप्प्यात सिंहगड स्पर्धेत साहिल नायर व वीणा जगनाडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

यास्पर्धेचे फ्लॅग ऑफ करण्यासाठी वेल्हे तालुका सभापती निर्मला जागडे, इतिहास संशोधक डॉ.नंदकिशोर मते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे उपस्थित होते. पहिला टप्पा गोळेवाडी सिंहगड गोळेवाडी अशी अकरा किलोमीटरची स्पर्धा होती. या सिंहगड स्पर्धेत ३७६ स्पर्धक सहभागी झाले होते.

पुरुष विजेते (स्पर्धेसाठी लागणारी वेळ)

पहिला क्रमांक साहिल नायर - ०१:१५:२३

दुसरा क्रमांक सचिन घोगरे- ०१:१९:११

तृतीय क्रमांक आकाश लकेश्री- ०१:२१:५२

महिला विजेत्या (स्पर्धेसाठी लागणारी वेळ)

पहिला क्रमांक वीणा जगनाडे -०१:४३:५८

दुसरा क्रमांक नेहा टिकम -०१:४९:०८

तिसरा क्रमांक सुकन्या बांदल - ०१:५२:३३

सिंहगड पायथा, गोळेवाडी येथे पहाटे साडे पाच वाजता फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेत भारतातील २० राज्यांच्या ५४ शहरातून तब्बल एक हजार ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला गेला आहे.

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही मॅरेथॉन महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या क्रिडा विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा ही स्पर्धा ठरलेली आहे. जागतिक वारसा असलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत शेकडो वर्ष ताठ मानेने उभ्या असलेल्या “सिंहगड- राजगड- तोरणा” या किल्यांवरून धावण्याची महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि भारतातील सर्वोत्तम स्पर्धा आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्रीतील गडकोटांच्या गौरवशाली ऐतिहासिक सुवर्णक्षणांची आठवण करून देणारया अतिशय चित्तथरारक आणि रोमांचकारी असलेल्या SRT स्पर्धेसाठी वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशन परिवाराने भारतातून आलेल्या १३०० रनर्सच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

फाऊंडेशनचे दिग्विजय जेधे, अनिल पवार, मारूती गोळे, महेश मालुसरे, मंदार मते, हर्षद राव, राजेश सातपुते, अमर धुमाळ, हरिष गवई, सुजीत ताकवणे यांनी याचे आयोजन केले आहे. यासाठी ४०० स्वयंसेवक ठिकठिकाणी हजर आहेत.

सिंहगड स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी उद्योजक उदयसिंह शिंदे, उद्योजक ललित शिंदे, उद्योजक सर्जेराव जेधे, दिगंबर पारगे सुधीर धावडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT