पुणे

SSC Result 2024 : वारे पठ्ठ्या! पुण्यातल्या प्रथमेशची कमाल; सगळ्याच विषयांत परफेक्ट 35 मार्क

संतोष कानडे

Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. पुण्यातल्या एका विद्यार्थ्याने सर्वच्या सर्व विषयात ३५ मार्क घेऊन कमाल केली आहे.

सगळ्यात विषयांमध्ये ३५ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव प्रथमेश तुपसौंदर असं आहे. तो पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला ५०० गुणांपैकी १७५ गुण मिळालेले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या सगळ्या विषयात त्याने काठावरचे ३५ मार्क मिळवले आहेत. सर्व विषयात सारखेच गुण मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहते.

राज्यात कोकण विभागातील ९९.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा नागपूर विभागाचा ९४.७३.टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून एकूण १५ लाख ६० हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून ९७.२१ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ९४.५६टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी २.६५ ने अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विभागानुसार निकाल

  • पुणे : २,६२,९४९ : २,५३,६०० : ९६.४४ टक्के

  • नागपूर : १,४९,८९७ :  १,४२,००५ : ९४.७३ टक्के

  • औरंगाबाद : १,८२,८४४ : १,७४,०५६ : ९५.१९ टक्के

  • मुंबई : ३,३९,२६९ : ३,२५,१४२: ९५.१९ टक्के

  • कोल्हापूर : १,२७,८१८ : १,२४,५६७ : ९७.४५ टक्के

  • अमरावती : १,५९,६८४: १,५२,६३१: ९५.५८ टक्के

  • नाशिक : १,९५,५८२ : १,८६,३५२ : ९५.२८टक्के

  • लातूर : १,०४,५०३ : ९९,५१७ : ९५.२७ टक्के

  • कोकण : २६,७८०: २६,५१७ : ९९.०१टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT