पुणे

ST Viral Video: लाडक्या बहि‍णींना कंडक्टरची दमदाटी, एसटीतून खाली उतरवले, व्हिडीओ होतोय व्हायरल

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) : महिला कंडक्टरकडून दमदाटी : रक्षाबंधनला घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल,; प्रवाशांकडून संताप व्यक्त

डी.के वळसे पाटील

Latest Pune News: भीमाशंकर ते पुणे एसटी गाडी(शिवाजीनगर अगार एम एच १४ के क्यू ४४२३) सोमवारी (ता,१९) मंचर बस स्थानकावर संध्याकाळी थांबली. रक्षाबंधन सणामुळे एसटीत महिला गेल्या. पण महिला वाहकाने दमदाटीची भाषा वापरून सदर प्रवासी महिलांना खाली उतरवले. त्यामुळे हे दृश्य पाहणाऱ्या बस स्थानकावरील अनेक लाडक्या बहिणींनी या प्रकाराविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वाहकाच्या कृतीला प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. दरम्यान घडलेल्या या घटनेची राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित महिला वाहकावर कारवाई करावी .अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी योजनेमुळे महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे बहिणी रक्षाबंधन करण्यासाठी आनंदानेमाहेरी ये जा करत होत्या. पण मंचर येथे घडलेल्या प्रकारामुळे लाडक्या बहिणीच्या आनंदावर विरंजन पडले. सोमवारी संध्याकाळी मंचर बस स्थानकात एसटी आली.

अनेक महिला व अन्य प्रवासी एसटीतजाऊन दाटी वाटीत उभे राहिले. महिला कंडक्टरने दमदाटी करून प्रवाशांना व जेष्ठ महिलांना हातधरून खाली उतरवले. त्यामुळे विशेषता लाडक्या बहिणींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

एसटीत जागा असताना महिला वाहकानेआरेरावी करत प्रवाशांना खाली का उतरवले? प्रवाशांना अपमान स्पद वागणूक दिली.या प्रकरणाची चौकशी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बाणखेले यांनी केली.

"संबंधित महिला वाहकाची चौकशी शिवाजीनगर आगाराने सुरू केली आहे. त्यांच्यावर रीतसर कारवाई केली जाईल"

बालाजी सूर्यवंशी

आगार प्रमुख तांबडेमाळा -मंचर. (ता. आंबेगाव)

"अनेक वाहक व चालक प्रवाशां समावेत भांडणे करतात. आपण सेवक आहोत. हे विसरतात. त्यांच्या ड्युट्या लावून देखील ते गैरहजर राहतात. त्यामुळे एसटी गाड्यांच्या फेऱ्या रद्द होतात. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीला अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते. वाहक चालकावर कारवाईचा बडगा उचलण्याचा प्रयत्न केल्यास ते स्थानिक पातळीवरील नेत्यांची नावे सांगून तुमच्या बदल्या करू असा दम आगारातील अधिकाऱ्यांना देतात . त्यामुळे आम्ही काम तरी कसे करावे हा आमच्या पुढे प्रश्न आहे?"अशी माहिती एका एसटीतील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT