Start day and night PMP bus service for passengers from railway station
Start day and night PMP bus service for passengers from railway station 
पुणे

रेल्वे स्टेशनवरून आता २४ तास बससेवा; 'या' 15 मार्गावरून धावणार बस

मंगेश कोळपकर

पुणे : शहरातील पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये घरी जाण्यासाठी पीएमपीने अहोरात्र बससेवा सुरू केली आहे. त्यासाठी दोन्ही शहरांतील 15 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. तसेच लोहगाव विमानतळासाठीही 5 बस गुरुवारपासून तैनात करण्यात येणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात लॉकडाउन सुरू असला तरी, देशातील 200 मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू आहे. त्यातील 13 गाडयांची वाहतूक दररोज पुण्यात होते. सुमारे 15 हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. तसेच जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनीही या बाबत पीएमपीला सूचना केल्या होत्या. त्यानुसार रेल्वे स्थानकावरील बस वाहतुकीला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार बसचे नियोजन करण्यात आले आहे, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

या १५ मार्गावरून धावणार बस
पुणे रेल्वे स्थानकावरून कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, कोथरूड, वारजे माळवाडी, विश्रांतवाडी, लोहगाव, हिंजवडी, वाकड, भोसरी, पिंपरी, निगडी, हडपसर, मुंढवा, कोंढवा, मार्केटयार्डसाठी बससेवा सुरू आहे. त्यासाठी 70 रुपये तिकिट आकारले जात आहे. बसची माहिती प्रवाशांना व्हावी, यासाठी 3 तिकिट तपासनीस आणि काही कर्मचारी तैनात करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लोहगाव विमानतळावर येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन सेंटरपर्यंत पोचविण्यासाठीही 5 बस तैनात करण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे स्टेशन आणि लोहगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यानुसार बसच्या फेऱयांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

वैद्यकी मदतीसाठी बसप्रवासावर अद्याप निर्णय होईना 
शहरात आपतकालीन सेवेत काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी पीएमपीची बससेवा सुरू आहे. त्यातून वैद्यकीय कारणासाठी प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या बाबत सांगवीतील रहिवासी बाळासाहेब टण्ण म्हणाले मला वैद्यकीय उपचारांसाठी नियमितपणे स्वारगेट परिसरात यावे लागते. दरवेळी रिक्षा आणि कॅब परवडत नाही. सुरू असलेल्य बसमधून प्रवास करण्याची परवानगी द्यायला हवी. या बाबत वाघमारे यांना विचारणा केली असता, या बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱयांकडे सादर केलेला आहे. त्यांनी परवानगी दिल्यावर वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांना बस प्रवासाला परवानगी देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Devendra Fadnavis: महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मंत्र्याला फडणवीसांचे भाजप प्रवेशाचे निमंत्रण

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

INDIA: अयोध्या जिंकणारा खासदार ठरणार जायन्ट किलर? लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी 'इंडिया'चा मोठा डाव

SCROLL FOR NEXT