Chandrakant patil sakal
पुणे

प्रार्थनास्थळे सुरू करा अन्यथा शाप लागेल

चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी भाजपचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे (corona) बंद असलेली प्रार्थनास्थळे सुरू करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे (BJP) कसबा गणपती मंदिरासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आली. यावेळी सरकारला जागे करण्यासाठी शंखनाद, घंटानाद करण्यात आला. प्रार्थनास्थळे सुरू करा अन्यथा जनतेचा शाप लागेल अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. एकीकडे नियम पाळू म्हणत असताना दुसरीकडे आंदोलनात अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून आले.

राज्य सरकारने प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बीडकर, सरचिटणीस दीपक नागपुरे, राजेश पांडे यांच्यासह शहर कार्यकारणीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यातील निर्बंध शिथिल केल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. पण दुसरीकडे राज्यभरातील सर्व धार्मिकस्थळे बंद आहेत. प्रार्थनास्थळे हे श्रद्धेचा भाग तर आहेतच, पण देवस्थानच्या परिसरात हार, फुले, नारळ आणि पूजा साहित्य विक्रीवर अनेक कुटुंबीयांची उपजीविका आहे. दीड वर्षापासून प्रार्थनास्थळे बंद असल्याने या नागरिकांची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.त्यामुळे प्रार्थनास्थळे सुरु होणे आवश्यक आहे. मंदिरांची वेळ ठरवून आणि भाविकांची संख्या निश्चित करुण ही परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन आज भाजपने आंदोलन केले.

‘‘प्रार्थनास्थळ सुरू करावेत ही मागणी केवळ हिंदूंसाठी नाही तर शिख, मुस्लीम, ख्रिश्‍चन यासह सर्वांसाठी आहे. उद्धव ठाकरे  जरा जागे व्हा, या महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेपैकी २५ लाख लोक देव मानत नसतील, म्हणून तुम्ही मंदिरे उघडत नसाल, पण तुम्हाला उर्वरित जनतेचा शाप लागेल.  गेल्या दोन वर्षापासून वारी बंद आहे, त्यांची मनःस्थिती तुम्ही समजून घ्या. अनेकांचे संसार प्रार्थनास्थळांवर संसार अवलंबून आहेत, त्यामुळे नियमावली करून मंदिरे खुली करा. लोकांची भावना समजून घ्या.’’

- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT