Ramesh Bais Sakal
पुणे

Governor Ramesh Bais : राज्य आणि केंद्र सरकारांनी शिक्षणाची जबाबदारी घ्यावी

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारांनी शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे, असे विधान राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी केले.

सम्राट कदम

पुणे - नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारांनी शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे, असे विधान राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२२ व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते.

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी वर्षभर पुढे ढकलण्याची नामुष्की आणि दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्राचा ढासळता आलेख, या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या या विधानाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्याच्या समग्र विकासासाठी पूर्व प्राथमिक पासून विद्यापीठांपर्यंत सर्वसामावेशक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. पदवी प्रदान समारंभाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, देशाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे आदी उपस्थित होते. आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आदिती कालिदास भोईटे हिला भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाने सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

पाटील म्हणाले,‘‘नवीन शैक्षणिक धोरणात ज्ञान, कौशल्य विकास, परंपरेचा अभिमान या बाबींवर भर देण्यात आला आहे. या तीन पैलूंच्या आधारे आणि शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे विद्यार्थ्यांनी प्रगती करावी.’’ डॉ.राजेश गोखले म्हणाले,‘‘जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे विकासाचे नवे सूत्र आहे.

या क्षेत्रात आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न स्नातकांनी पूर्ण करावे. बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम, बदलाला सामोरे जाण्याची क्षमता जीवनात यशस्वी करेल.परिश्रमाशिवाय यश नाही, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल करावी.’’ विद्यार्थ्यांना टपालाद्वारे पदवी त्यांच्या पत्यावर पाठविण्यात येणार आहे.

पदवी प्रदान आकड्यांमध्ये -

  • एकूण पदव्यांची संख्या - १ लाख २१ हजार २८१

  • पदवीचे विद्यार्थी - ९३ हजार ९८३,

  • पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी - २६ हजार ४५४,

  • पीएचडीचे विद्यार्थी - ४३८

  • एमफिलचे विद्यार्थी - ११

सुवर्णपदक विजेत्यांचे विवरण -

  • विद्यार्थी - ३०

  • विद्यार्थिनी - ४०

  • एकूण विद्यार्थी - ७०

  • सुवर्णपदकांची संख्या - १०७

पदवी किंवा सुवर्णपदक मिळविणे हा शेवटचा उद्देश नाही. तर येणाऱ्या युगासाठी आपण सज्ज असायला हवे. शिक्षणाबरोबरच औद्यागिक केंद्र असलेल्या पुण्याचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग व्हायला हवा. उद्योगांमधील आधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत करणाऱ्या गतिशील अभ्यासक्रमांची रचना विद्यापीठाने विकसित करावी.

- रमेश बैस, राज्यपाल तथा कुलपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT