State Government issues instructions for Navratri celebrations 
पुणे

पुणेकरांनो, यंदा नवरात्रौत्सवात दांडियाही नाही; राज्य सरकाराच्या सूचना

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे यंदा नवरात्रौ उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. मिरवणुकीवर मर्यादा घालण्यात‌ आल्या असून, गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम देखील आयोजित करता‌ येणार नाहीत. रावणदहन देखील गर्दीविना साध्या पद्धतीने करावे लागणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने यासंबंधी‌ सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्वपरवनागी घेणे बंधनकारक आहे. मंडप देखील प्रशासनाच्या नियमानुसार उभारावा लागणार आहे. हा उत्सव साध्या‌ पध्दतीने साजरा  घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी देवीचे विसर्जन प्रशासनाच्या‌ आवाहनानुसार करावे, असे सरकारने सूचित‌ केले आहे.

देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू वा संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची वा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात‌ आले आहे. 

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.  आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन भाविकांना करावे लागणार आहे.

वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

नवरात्रौ उत्सवासाठी सूचना

- देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकवर उपलब्ध करुन द्यावी.

- देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे,‌ स्वच्छतेचे नियम पाळावे. मास्कचा वापर बंधनकारक आहे. 

- देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

- लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

- महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. 

- गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. 

- उत्सव मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

- विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

 - दसऱ्याच्या दिवशी होणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलावू नयेत.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT