Ajit Pawar File photo
पुणे

मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर : उपमुख्यमंत्री

आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणून कामगारांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सकाळ वृत्तसेवा

आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणून कामगारांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (state government will provide Rs 5 lakh aid to families of victims said Deputy CM Ajit Pawar)

पवार म्हणाले, ''ही आग आटोक्यात आली असून, कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आगीचे प्राथमिक कारण समजेल. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे समोर आल्यानंतर दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल.''

या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोचले. तसेच, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख आणि पीएमआरडीए आयुक्तांकडून याबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.

आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणून कामगारांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु काहींना वाचवता आले नाही. अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT