ajit pawar sakal
पुणे

Baramati News : नव्या खातेवाटपाचा बारामतीकरांना असाही होणार फायदा

नवीन खाते वाटपामध्ये अर्थ मंत्रालयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली.

मिलिंद संगई

बारामती - राज्य मंत्रिमंडळात नव्याने खाते वाटप झाल्यानंतर बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अनेक प्रलंबित प्रश्न आता वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन खाते वाटपामध्ये अर्थ मंत्रालयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, त्याच वेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून राष्ट्रवादीचेच अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन्ही विभाग राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे आल्यामुळे बारामतीच्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे शासन दरबारी प्रलंबित असलेले विषय आता वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हाफकीन या संस्थेकडे खरेदीप्रक्रीयेची जबाबदारी होती. मात्र या संस्थेच्या असमाधानकारक कामकाजामुळे अनेक वर्ष साधनसामग्री न मिळाल्याने कामकाज रखडले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही कामे वेगाने मार्गी लावण्याचा दृष्टीने पावले उचलली होती.

अजित पवार यांनी पाठपुरावा करुनही अनेक विषय लालफीतीत अडकलेले होते. आता नव्याने पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झालेली असल्याने व अजित पवार यांच्या सल्ल्याने ते काम करीत असल्यामुळे बारामतीच्या या महाविद्यालय व रुग्णालयाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील व त्याचा फायदा पंचक्रोशीतील अनेक रुग्णांना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सीएसएसडी प्रकल्प कार्यान्वित करणे, ऑपरेशन थिएटर्स सुरु करणे, एमआरआय मशीन कार्यान्वित करणे, अपघात विभाग सुरु करण्यासह अनेक कामे या पुढील काळात वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT