मयुर कॅालनी - 'मोनोरेल प्रकल्प थांबवा अन्यथा भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा खासदार वंदना चव्हाण यांनी प्रशासनाला दिला आहे. कोथरूड येथील थोरात उद्यानात होत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध असून देखील प्रशासन हा प्रकल्प रद्द करत नसल्याने खासदार वंदना चव्हाण यांनी उद्यानात येऊन पाहणी केली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
गिरीश गुरनानी म्हणाले,' या प्रकल्पामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होणार असून पर्यावरणाचे मोठे अटळ आहे. यावेळी स्वप्नील दुधाने, किरण अडागळे, दिलीप जनोरकर यांच्यासह थोरात उद्यान बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
कोथरूडमध्ये खरी मेट्रो आली असताना जवळच थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्प कशामुळे उभारला जातोय? या उद्यानात पूर्वी विरंगुळा केंद्र, सार्वजनिक व्यायम साहित्य, कारंजे, डायनासोर, लहान मुलांचे खेळाचे साहित्य, लढावू विमान असे विविध प्रकारचे साहित्य असतांना कोट्यावधी रूपये खर्चून मोनोरेल प्रकल्प ऊभारण्याचा घाट महापालिकेकडून घातला जात आहे.
नागरिकांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना, २०२२ पासून मोनोरेल प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असून महापालिका आधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस नागरिकांचा विरोध वाढत असून विविध पक्षातील नेत्यांनी देखील हा प्रकल्प होऊ नये अशी भुमिका घेतली आहे.
मोनोरेल प्रकल्पाविषयी
४०० मीटरचा रूळ जमीनीपासून उंचावर तयार करण्यात येणार आहे.
दोन बोगी, एक इंजिन असणार आहे. थोरात उद्यानात मोनोरेल बसवण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाकडून २०१८-१९ मध्ये मोटार वाहन विभागाकडे देण्यात आला.
२०२४-२५ या वर्षाच्या आंदाजपत्रकात दोन कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पात दोन झाडं जातील असं मोटार वाहन विभागाकडून सांगण्यात आलं.
एकूण पाच कोटीची निविदा आहे.
शहरात चार ठिकाणी फुलराणी आहेत. कात्रज तळे, पेशवे उद्यान, वडगाव शेरी, घोरपडी पेठ
'लहान मुलांना खेळायला जागा शिल्लक नाहीत, पदपदथावरून चालता येईल असं चित्र कुठं दिसत नाही. उद्यानात पूर्वीच भरपूर प्रकल्प राबवलेले आहेत. या परिसरातील ९० टक्के लोकांचा विरोध असताना महापालिका हा प्रकल्प का लादत आहे? याचा महापालिका आयुक्तांनी विचार करायला हवा.'
- श्वेता यादवाडकर, नियमित बागेत येणारे परिसरातील रहिवासी.
'मोनोरेल प्रकल्प सुरू करण्यासाठी थोरात उद्यानात पाया घेण्यासाठी चाचणी केल्यानंतर नागरिकांचा विरोध होत आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर क्षेत्रीय वृक्ष आधिकारी यांच्याकडे देता येतील'.
- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक
'सध्या प्रकल्पाचे कोणतेही काम सुरू नाही.मोनोरेल प्रकल्प करू नये म्हणून नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत.कोरोना येण्यापूर्वी उद्यान विभागाने मोनोरेल प्रकल्प करण्यासाठी प्रस्ताव दिला होतो.जवळच मेट्रो असल्याने नागरिकांचा याला विरोध होत आहे.'
- जयंत भोरेकर, उपायुक्त मोटार वाहन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.