पुणे - ‘पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal) भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आल्यापासून आम्ही सार्वजनिक वाहतूक (Transport) व्यवस्था मजबूतीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच पीएमपीएमएल (PMPML) मार्फत १० रुपयांत प्रवास (Journey) ही योजना आम्ही आणली आहे. भविष्यात पीएमपीएमएल मधून मोफत प्रवासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत,’’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
नगरसेवक प्रकाशजी ढोरे यांना पीएमपीएमएलचे संचालक पद मिळाल्याबद्दल त्यांचा औंध-बोपोडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच शहर अध्यक्ष जगदीश मुळीक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार सिध्दार्थ शिरोळे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रवक्ते संदिप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, पुनित जोशी, माजी महापौर सुरेश शेवाळे, आनंद छाजेड, गणेश स्वामी, रमेश नाईक, सचिन घोरपडे, अंकल रावत, अविराज हुगे, रोहित भिसे, अजित पवार, सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, योगेश केरकर,सिद्धार्थ गायकवाड, संतोष भिसे, अरुण बागडी, अनिल माने, प्रतीक वाघमारे आदी उपस्थित होते. शहर चिटणीस सुनील माने यांनी आयोजित सांगवी येथील बालाजी लॉन्स येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील उत्कृष्ठ काम करणाऱ्या माणिक गायकवाड, सुनीता रावत, अंबिका कोळी, रेणुका रेटवडे, सुदेश जाधव, अशोक कदम, दशरथ भालेराव, सुप्रिया चौधरी या शक्तिकेंद्र प्रमुखांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पीएमपीएमएल हे सर्वसामान्यांचे वाहन आहे. प्रकाश ढोरे हे सर्वसामान्यांचे नेते असल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वसामान्यांना त्यांच्या घरातील सदस्यच संचालक झाल्यासारखे वाटत आहे.
सुनील माने यांचा कार्य अहवाल म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो याचे उत्तम उदाहरण असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, प्रकाश ढोरे यांना शहराची चांगली माहिती आहे त्यामुळे त्यांच्या रूपाने पीएमपीएमएलसाठी योग्य संचालक मिळाला असल्याचे मत व्यक्त केले. शक्तिकेंद्र प्रमुख हा पक्षाचा आत्मा असल्याने त्यांना सन्मानित करणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूती बरोबरच ही व्यवस्था पर्यावरण पूरक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुण्याच्या इतिहासात इतकी मोठी पर्यावरण पूरक बस खरेदी कधी झाली नाही. म्हणूनच सध्या १५० इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत आहेत. त्याचप्रमाणे पुढील काळात आणखी ३५० ई बस खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.