पुणे

Pune Crime : इनशर्ट नाही म्हणून... पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं; मुलाच्या कान अन् नाकातून आलं रक्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यार्थ्याने इनशर्ट केली नाही म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या नाकातून व कानातून रक्त आले होते. मारहाण झालेला मुलगा स्वारगेट परिसरातील एका शाळेत शिकतो. २७ सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. याबाबत शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश भोसले (वय २६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मुलाच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षकावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ११ वर्षीय मुलगा स्वारगेट परिसरातील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकत आहे.

मुलाचा कॉम्पुटर क्लास सुरू असता त्याचे शिक्षक भोसले यांनी मुलाला इनशर्ट का केले नाही, असे विचारत हाताने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या नाकातून व कानातून रक्त आले. या घटनेची माहिती मुलाने शाळेतून घरी आले आल्यानंतर फिर्यादी आणि आर्इला दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष तानवडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT