Student Education sakal
पुणे

द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ; पाच वर्षांत ४० ते ७० टक्के जागा रिक्त

द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारखे ठराविक अभ्यासक्रम घेतले, तरच बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाची असंख्य दालने खुली होतात.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारखे ठराविक अभ्यासक्रम घेतले, तरच बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाची असंख्य दालने खुली होतात. तर, द्विलक्षी अभ्यासक्रमातील अन्य अभ्यासक्रम घेतल्यास अशा विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या शिक्षणाच्या संधी काहीशा मर्यादित असतात.

याशिवाय केवळ बारावीनंतर नोकरी मिळणेही अवघड होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांपैकी ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहत असल्याचे दिसून येते.

पुणे जिल्ह्यात १८८ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण १७ हजार ४७५ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी (२०२३-२४) या अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या १४ हजार ९५० जागांपैकी केवळ नऊ हजार सहा जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत रिक्त राहणाऱ्या जागांचे प्रमाण ४० ते ७० टक्के इतके आहे. खरंतर, व्यवसाय अभ्यासक्रमातून करिअर आणि उच्च शिक्षण घेण्याची उत्तम संधी देणारा अभ्यासक्रम म्हणून द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. राज्यात ‘प्लस दोन’ स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम योजनेअंतर्गत तांत्रिक, वाणिज्य, कृषी आणि मत्स्य या चार गटांत एकूण १६ अभ्यासक्रम राबविले जातात.

त्यात तांत्रिक गटात मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्कूटर, मोटरसायकल दुरुस्ती, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, केमिकल प्लांट ऑपरेशन हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, अशा काही मोजक्याच अभ्यासक्रमांना वाढती मागणी आहे. तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहत आहेत.

अशी आहे रचना

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत या अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येते.

  • हा अभ्यासक्रम इयत्ता ११वी-१२वी स्तरावर राबविण्यात येतो.

  • ११वी-१२वीमध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांबरोबरच द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येते. द्वितीय भाषा (मराठी / हिंदी / संस्कृत / जर्मन /फ्रेंच) आणि जीवशास्त्र/भूगोल या दोन विषयांऐवजी विद्यार्थी द्विलक्षी अभ्यासक्रमाचा (बायफोकलचा) सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिकासह एकच अभ्यासक्रम निवडू शकतात.

अभ्यासक्रमातून उपलब्ध होणाऱ्या संधी

  • शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त होत असल्याने बारावीनंतर नोकरी आणि रोजगार मिळू शकतो.

  • बारावीनंतर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय करू शकतात.

  • बी.ई./बी.टेक प्रवेशासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतात.

  • अकरावीपासून विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या विचारांची सवय लागते

  • अभियांत्रिकी शिक्षणात अधिक चांगले गुण मिळवू शकतात

द्विलक्षी अभ्यासक्रमातील कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स अशा विशिष्ट अभ्यासक्रमांना वाढती मागणी आहे. त्या तुलनेत अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या जागा रिक्त राहत आहेत. संपूर्ण शिक्षण क्षेत्रावरच कोरोनाच्या संकटाचे पडसाद उमटले, त्याचपद्धतीने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.

याशिवाय अकरावीत महत्त्वाच्या दोन विषयांऐवजी विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडतात. त्यामुळे बारावीनंतरच्या शिक्षणाच्या मर्यादित संधीच या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. परंतु, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जाणारे बहुतांश विद्यार्थी बारावीत अधिक गुण मिळावेत, म्हणून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात.

- यू. के. सूर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT