पुणे : घरात बसून ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत, विषय समजत नाही, लक्ष लागत नाही, जर जानेवारीमध्ये महाविद्यालय पुन्हा सुरू होणार असेल, तर हे आमच्यासाठी नव्या वर्षाचं गिफ्ट असेल. महाविद्यालयांनी सुरक्षेची तयारी करावी, आम्ही त्यांना सहकार्य करू अशा शब्दात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्राचार्यांची दोन दिवस संवाद साधला. त्यांची मते, सूचना जाणून घेतल्या, अनेक प्राचार्यांनी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. इयत्ता नववी ते बारावी शाळा आणि महाविद्यालय सुरू होत असताना उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थाही सुरू व्हाव्यात, अशी भूमिका कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बैठकीत मांडली होती. याबाबत 'सकाळ'ने विद्यार्थ्यांचीही भूमिका जाणून घेतली.
बीएच्या तृतीय वर्षात शिकणारी शर्वरी ढोले म्हणाली, "ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विषय देखील पूर्ण समजत नाही. आमचे शेवटचे वर्ष असल्याने कॉलेज सुरू होणार असेल, तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कॉलेजने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात आम्हीही स्वतःची काळजी घेऊ."
बीएससी तृतीय वर्षात शिकणारी भक्ती सत्तीकर म्हणाली, "ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत, तसेच प्रॅक्टिकल पण होत नाहीत. त्यामुळे महाविद्यालय सुरू होणार असेल, तर हे आमच्यासाठी नव्या वर्षाचे गिफ्ट आहे. योग्य काळजी घेतली तर कोरोनाचा धोका टाळता येईल.
इंजिनिअरींग करणारा गणेश कुलकर्णी म्हणाला, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन महाविद्यालय सुरू करण्यास काही हरकत नाही. तसेच पहिल्या सेमिस्टरची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये काॅलेज सुरू करावेत."
'कोरोना'ची लागण होणार नाही अशी व्यवस्था करून आणि नियमांचे पालन करून थेट महाविद्यालय सुरू करावेत. तसेच पुणे विद्यापीठाचे विभाग सुरू करतानाही सर्व तयारी करावी, असे एमकाॅम करणारा सौरभ शिंदे यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.