Study Rooms are closed students are sick before upcoming exams  
पुणे

अभ्यासिका बंद, विद्यार्थी आजारी अन् परीक्षा तोंडावर!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा येत्या रविवारी (ता.११) होणार असताना शहरातील अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत, अनेक विद्यार्थी पाॅझिटिव्ह असल्याने त्यांची परीक्षेची संधी हुकणार आहे. त्यामुळे एकीकडे अडचणींशी मालिका सुरू असताना परीक्षा घ्यावी की नको यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये पडले आहेत. कोरोनामुळे गेले वर्षभर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलल्या जात होता. अखेर विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर या परीक्षा या परीक्षा मार्च- एप्रिल महिन्यात होत असून, आत्तापर्यंत दोन परीक्षा झाल्या असून शेवटची ११ एप्रिल रोजी होणार आहे. 

राज्यभरासह पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यातच पुण्यात ११ मार्च रोजी परीक्षेसाठी झालेल्या आंदोलनानंतर अनके विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. अनेकांना लागण झाली असून, त्यात दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यात ३०  एप्रिल पर्यंत कडक निर्बंध आले आहेत, त्यामुळे शहरातील अभ्यासिका आज (बुधवार) पासून बंद झाल्या आहेत. 

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तसेच एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.  तर काहींनी अवघ्या तीन दिवसांवर परीक्षा असल्याने ही परीक्षा घेऊन एकदाची सुटका करावी अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, आयोगाने परीक्षा होणार आहेत असे स्पष्ट केले  आहे.  परीक्षेच्या पूर्वी अभ्यासिका बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय झाली आहे.  हाॅस्टेल किंवा खोलीवर दोन तीन पेक्षा जास्त विद्यार्थी रहातात. त्यामुळे गोंगाटात अभ्यास करताना अडथळे येत आहेत असे विद्यार्थ्यांनी सांगितले. 


"कोरोना रुग्ण वाढत असले तरी आयोगाने ठरलेल्या दिवशी परीक्षा घेऊन टाकावी. परीक्षा लांबणीवर पडली तर आम्हाला अजून पुण्यात रहावे लागेल. त्यातून कोरोनाचा धोका वाढू शकतो. तसेच अभ्यासिकेत विद्यार्थी नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना सतत मास्क घालून बसणे ही शक्य नाही. अडचणी खूप आहेत, पण परीक्षा झाली पाहिजे. " 
-नितीन मेटे, परीक्षार्थी 

हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर

"सध्या अभ्यासिकेत २५ ते ३० टक्केच उपस्थिती होती. परीक्षेपूर्वी एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका महत्त्वाची आहे. पण आता अभ्यासिका बंद करण्यास सांगितल्या आहे. आज विद्यार्थ्यांना त्यांचे पुस्तक घेऊन जाण्यासाठी वेळ दिला आहे."
- आनंता कदम, अभ्यासिका चालक

"माझ्या रूममधील दोघे जण पाॅझिटिव्ह आल्याने मला गावाकडे यावे लागले. असे अनेक विद्यार्थी पुण्यात आहेत. ११ तारखेची परीक्षा रद्द न केल्यास अनेक विद्यार्थी धोकादायक स्थितीत परीक्षा देऊन गावाकडे जातील. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढू शकते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी."
- रोहित शिंदे, परीक्षार्थी

६५ टक्के  विद्यार्थ्यांना परीक्षा नको 
११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी की नको असा ऑनलाईन सर्वे घेण्यात आला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत १ हजार ६८६ जणांनी सहभाग घेतला असून, १ हजार ९३ (६५ टक्के) जणांनी परीक्षा पुढे ढकलावी हा पर्याय निवडला आहे. तर ५९६ (३५) जणांनी परीक्षा ठरल्या प्रमाणे घ्यावी असे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT