paithani-mask 
पुणे

मला भारीतील पैठणीचा किंवा शालूचा मास्क हवाय म्हणजे हवाय

सु. ल. खुटवड

आज सायंकाळी आम्ही घरी गेलो तर वातावरण "गरम' व चहा "थंड' असल्याचे जाणवले. निमूटपणे चहा प्यालो नाहीतर चक्रीवादळाचाच सामना करावा लागला असता. 

""बरे वाटत नाही का''? आम्ही आपुलकीने बायकोला विचारले. 

""मला काय धाड भरलीय.'' हे उत्तर. ""काही साडी खरेदी, दागिने करायचे आहेत का ? तसं असेल तर लगेच निघू.'' यावर फक्त भांडी आदळण्याचा आवाज आला. ""एखादा हिऱ्याचा दागिना पाहण्यात आला आहे का''? आम्ही पुढचा प्रश्‍न विचारला. 

यावर प्रतिक्रिया म्हणून मुलाच्या पाठीत धपाटे बसण्याचा आवाज आला. त्यावर "दोघांचे भांडण आणि तिसऱ्याला फटका' असं पुटपुटत मुलगा बेडरूमच्या दिशेने पळाला. दोन- तीन मिनिटांनंतर किचनमधून मुसमुसण्याचा आवाज आला. 

""अगं काय झालं ते तरी सांग. आम्ही काय दुसऱ्यांच्या मनातील ओळखायला सिद्ध पुरुष वाटलो का''? सशाच्या डोळ्यातील व्याकुळता चेहऱ्यावर आणत म्हटले. बायको काही बोलत नसली की ही वादळापूर्वीची शांतता आहे, हे आमच्या इतक्‍या वर्षांच्या संसारानंतर लक्षात आले आहे. 

""तुमचे माझ्यावर प्रेमच नाही राहिलं. लग्नाआधी चंद्र- तारे तोडून आणण्याचा गप्पा करत होतात आणि आता....'' बायकोने डोळे पुसले. 

""तुझ्यासारखी नक्षत्रासारखी बायको घरात असताना लग्नानंतर कशाला हवेत चंद्र - तारे? '' ही मात्रा हमखास लागू पडते, हा आमचा अनुभव आहे. 

मात्र, आज तसे काही घडले नाही. 

""तुम्हाला माझी कदरच नाही. गेल्या आठ- दहा महिन्यांत एकदा तरी नवीन मास्क घेऊन दिलात का? आज आमची महिलामंडळाची भिशी होती. शंभर बायका जमा झाल्या होत्या. काय एकेकीचे रंगीबेरंगी आणि उंची मास्क होते आणि माझा अगदी जुना आणि जीर्ण झालेला मास्क. मला तर बाई भयंकर लाज वाटली. त्या नेनेबाई आणि पाटेबाई तर सारख्या माझ्या मास्ककडे बघून फिदीफिदी हसत होत्या. दीक्षित बाई आणि देशमुख बाईंच्या भोवती सगळ्यांनी गराडा घालून "कोठून घेतले इतके भारी मास्क' असे विचारत होत्या. काय बाई या दोघींचा तोरा. माझ्या मिस्टरांनी फॉरेनवरून आणलेत, असं सांगून भाव खात होत्या. काहीही फेकतात मेल्या. मीही मनात म्हटलं, "तुमच्यापेक्षा भारीतील मास्क आणून, नाही तुमची जिरवली तर नवऱ्याचं नाव बदलून ठेवीन, असा मी पण केला आहे.'' यावर आम्ही खिडकीबाहेर पाहू लागलो. 

""सगळ्यांचे भारी भारी मास्क असल्याने माझ्याकडे तर कोणी ढुंकून पाहत नव्हते. मला खूप अपमानास्पद वाटले.'' बायकोने एका दमात सांगितले. 

""अगं आता तर सांगितलेस ना ! नेनेबाई आणि पाटेबाई सारख्या तुझ्याकडे बघत होत्या आणि कोरोनाची साथ अजून संपली नसताना इतक्‍या बायका एकत्र कशाला जमल्या होत्या?'' मी नेमकेपणाने प्रश्‍न विचारला. 

""तुम्ही फाटे फोडू नका. मला भारीतील पैठणीचा किंवा शालूचा मास्क हवाय म्हणजे हवाय. त्या दोघींनाही मला जळवायचंय.'' असे म्हणून तिने व्हॉटसअपवर आलेले मास्कचे पंधरा- वीस नमुने दाखवले. यावर आमच्या चेहऱ्यावरील भाव दिसू नयेत म्हणून आम्ही घरात असूनही तोंडावर मास्क लावला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT