Crime Sakal
पुणे

खंडणी उकळणा-या पोलिस उपनिरीक्षकाला अटक

मुंढवा भागातील तीन हॉटेलमधून सात हजार रुपयांची खंडणी उकळणा-या पोलिस उपनिरीक्षकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंढवा भागातील तीन हॉटेलमधून (Hotel) सात हजार रुपयांची खंडणी उकळणा-या पोलिस उपनिरीक्षकाला (Sub-Inspector of Police) मुंढवा पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध खंडणीचा (Ransom) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

मिलन कुरकुटे असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कुरकुटे हा हिंजवडी पोलिस ठाण्यात नियुक्तीला होता. गेल्या २१ ऑगस्टपासून तो वैद्यकीय कारणावरून रजेवर होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुरकुटे आपल्या चारचाकी गाडीतून गणवेशात मुंढव्यातील हॉटेल लोकल गॅसस्ट्रो ॲन्ड बार येथे गेला. ताबडतोब हॉटेल बंद करा. नाही तर मी तुमच्या हॉटेलवर कारवाई करीन, असे हॉटेलचे व्यवस्थापक मारुती गोरे यांना बजावले. त्यावेळी गोरे यांनी त्याला आमच्या हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नसल्याचे सांगितले. त्यावर कुरकुटे याने गोरे याला सांगितले की, मी आयुक्तालयातून आलो आहे. तुमचे हॉटेल चालू होते. त्यामुळे कारवाई होवू द्यायची नसेल तर मला दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून जबरदस्तीने २ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्जमध्ये जाऊन दोन हजार रुपयांची खंडणी घेतली. दोन्ही ठिकाणी खंडणी घेतल्यानंतर कुरकुटे याने एबीसी रस्त्यावरील हॉटेल कॉनिव्हल गाठले. ते हॉटेल बंद असताना मॅनेजर किशोर थापा याला हॉटेल उघडण्यास भाग पाडून त्याच्यावर कारवाईची धमकी देऊन तीन हजार रुपयांची खंडणी जबरदस्तीने घेतली, असे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांना बुधवारी सकाळी समजली. पोलिसांनी हॉटेलचालकांकडे याची चौकशी केल्यानंतर मारुती गोरे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक एच. एस. गिरी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

Kolhapur Result : हसन मुश्रीफ, आबिटकरांचे मंत्रिपद निश्‍चित; अमल महाडिक, राजेश क्षीरसागरांनाही 'लॉटरी' शक्य

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT