Subedar Ajit Ashok More sakal
पुणे

Subedar Ajit Ashok More : सुभेदार अजित अशोक मोरे ; सैन्यातर्फे मानवंदना देऊन लष्करी इतमामात साश्रू नयनांनी निरोप

धानोरी येथील रहिवासी व सैन्य दलात लेह लडाख या ठिकाणी सेवा बजावत असणारे सुभेदार अजित अशोक मोरे (वय ४२ वर्षे) यांचे काल लडाखमध्ये निधन झाले.

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी : धानोरी येथील रहिवासी व सैन्य दलात लेह लडाख या ठिकाणी सेवा बजावत असणारे सुभेदार अजित अशोक मोरे (वय ४२ वर्षे) यांचे काल लडाखमध्ये निधन झाले. २१ से. तापमानात ते आपले कर्तव्य बजावत असताना खराब हवा व ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे २२ फेब्रुवारी रोजी पहाटे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. त्यांना आज सैन्यातर्फे मानवंदना देऊन लष्करी इतमामाने साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.

यावेळी अनेक सैनिक, माजी सैनिक, मित्रपरिवार, कोकण रहिवासी संघाचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांच्या माळांनी सजवलेल्या शवपेटीवर तिरंगा आच्छादित करून सलामी देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या परिवाराने फोडलेला टाहो उपस्थितांचे काळीज चिरत गेला. अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृतदेह धानोरीनंतर रामनगर येथे नेण्यात आला. येरवडा येथे अमरधाम समशनभूमी येथे त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

२० वर्षांपासून अजित मोरे हे लष्करात असून त्यांचे वडील अशोक मोरे हेही माजी सैनिक आहेत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील, भाऊ, बहीण,आजोबा असा परिवार आहे. अजित पूर्वी येरवड्यात रामनगर येथे राहत होते. त्यांचे शालेय शिक्षण खडकी कॅन्टोन्मेंटच्या लोकमान्य टिळक शाळेतून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण आलेगावकर व टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी येथे झाले होते.

ते २००२ मध्ये बॉम्बे सॅपर्समध्ये क्लार्क म्हणून रुजू झाले. आपल्या धाडसी, मनमोकळ्या व हसतमुख स्वभावाने व नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. २०११ मध्ये ते इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून कनिष्ठ इंजिनियर म्हणून रुजू झाले. सध्या त्यांची पोस्टिंग लडाख येथे होती. मूळचे ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अस्तान तिसंगी या गावचे होते. त्यामुळे गावच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक बाबींना ते सढळ हस्ते मदत करीत. त्यांच्या जाण्यामुळे धानोरी परिसरात व खेड तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT