Sudden fire at private company tower terrace building BRT bus stand Vishrantwadi sakal
पुणे

Fire Accident : विश्रांतवाडी येथे बीआरटी बस थांब्यासमोर इमारतीच्या टेरेसवर भीषण आग

खाजगी कंपनीच्या टॉवरला अचानक भीषण आग

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी : विश्रांतवाडी येथे बीआरटी बसथांब्यासमोर विजय शांती हाईटस इमारतीच्या टेरेसवर असलेल्या खाजगी कंपनीच्या टॉवरला दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

नागरिकांनी त्वरित पोलिसांना व अग्निशामक दलाला कळविले. त्यामुळे लगेचच धानोरी आणि येरवडा येथील अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात त्यांना यश आले. या घटनेत जीवितहानी घडली नाही, पण तेथील सर्व केबल्स व इतर सामान जाळून खाक झाले.

या संदर्भात विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजू वसंत महानोर यांनी सांगितले की कस्तुरबा सोसायटी ब मधील ही इमारत ३० वर्षे जुनी आहे. त्यावर असलेल्या टॉवरला आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. नागरिकांची खूप गर्दी यावेळी झाली होती. यावेळी बी. बी. वनवे आणि रामचंद्र केंद्रे यांचे साहाय्य लाभले.

अग्निशामक दलाचे अधिकारी सोपान पवार म्हणाले की इमारत जुनी असली तरी अग्निशमन यंत्रणा होती. पण ती पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या सहा मजली इमारतीच्या टेरेसवर पाईप नेणे अडचणीचे होते. शिवाय जिन्यावर खूप सामान होते.

टेरेसवर दारूच्या बाटल्याचा खाच पडला होता. यातून मार्ग काढत वर जावे लागले. या पथकातील तांडेल अंकुश पालवे, भाऊसाहेव चोरमले, फायरमन रोहिदास टिंगरे, विट्ठल आढारी, चालक रघुनाथ भोईर, शंकर गायकवाड, मदतनीस आकाश राठोड, सूरज निवळकर, शाहनवाज सय्यद, अमोल रणदिवे यांनी आज विझविण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान इमातीमधील नागरिकांची घबराट होऊन ते इमारतीबाहेर तात्काळ पडल्याने मोठी जीवितहानी टळली. यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.विशेष म्हणजे या टॉवरलगतच अनेक खाजगीसह महावितरण विभागाच्या केबल गेल्याने लागलेल्या आगीत त्या जळून खाक झाल्या.विशेष म्हणजे या इमारतीच्या पाठीमागील बाजूस भीमनगर झोपडपट्टी असून आगीत जर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती तर यास जबाबदार कोण?असा संतप्त सवाल येथील रहिवासी व बहुजन समाज पार्टीच्या शहर उपाध्यक्षा मेनका जितेंद्र कराळेकर यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT