मुंबई : नरेंद्र मोदी मेरे बडे भाई है असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि मोठ्या भावाचं लहान भावानं काही गोष्टी ऐकायला हव्यात, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.
'राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करुन ठेवलाय'
मुनगंटीवार म्हणाले,' भाजपला खोटे ठरविण्या आगोदर विचार करायला हवा, जनादेश हा जनतेची सेवा करण्यासाठी होता. मोदीजी अमित शहा यांच्यावर मित्र पक्षांनी कधीही टीका केली नाही. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही. आम्हाला विकासाचे उन्नतीचे कार्य करायचे आहे. राम मंदिर आमच्यासाठी कायम महत्वाचे असून प्रभू रामचंद्राच्या तत्वारच आम्हाला राज्य करायचे आहे.
राजकीय भूकंप होणार? काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला
समझोता करतच मुंबई महापालिकेत भाजपने कुठलेही पद घेतले नाही. लोकांची सेवा करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी असल्याचेही मुनगंटीवार यांनी केले आहे. निवडणुकीच्या निकाला नंतर कोणतीही चर्चा न करता आम्हाला इतर पार्याय खुले आहेत ही घोषणा सेनेने केली ही चूक कोणाची आहे आणि मार्ग कोणी बंद केले यावर विचार व्हावा असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.