Solar Energy Generation sakal
पुणे

Solar Energy Generation : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

वार्षिक एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या राज्याच्या साखर उद्योगाला सौरऊर्जा निर्मितीकडे नेण्याच्या हालचाली साखर आयुक्तालयात सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वार्षिक एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या राज्याच्या साखर उद्योगाला सौरऊर्जा निर्मितीकडे नेण्याच्या हालचाली साखर आयुक्तालयात सुरू झाल्या आहेत. नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व साखर उपपदार्थ विभागाचे नवनियुक्त सहसंचालक अविनाश देशमुख यांच्याकडून सध्या ‘सौरऊर्जा निर्मितीत साखर उद्योगाला असलेला वाव’ या विषयाचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सौरऊर्जा निर्मितीची वाटचाल ठरविण्यासाठी लवकरच साखर आयुक्तालय, साखर उद्योग, महावितरण अशा मुख्य यंत्रणा एकत्रितपणे चर्चा करण्याची शक्यता आहे.

‘‘एक मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्यासाठी साडेतीन ते चार एकर जमीन व चार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. शासनाचे पाठबळ मिळाल्यास ते शक्य आहे. धाराशिवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने सौरऊर्जा निर्मितीत यशस्वी पाऊल टाकलेले आहे. साखर कारखान्यांना सध्या खर्चिक बगॅस जाळून सहवीज निर्मिती करावी लागते. नव्या प्रकल्पांना ही वीज प्रतियुनिट केवळ ४.७५ रुपये ते ४.९९ रुपये मिळवून देते. त्या तुलनेत सौर वीज २.७० रुपये मिळवून देईल. परंतु त्यासाठी कच्चा माल लागणार नाही,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

साखर कारखान्यांनी बिगर हंगामात लागणारी वीज स्वतः सौर प्रकल्पात तयार केल्यास अधिकची सहवीज विकता येईल. यापूर्वीच्या नियमाप्रमाणे कारखान्यांना केवळ एक मेगावॉटपर्यंत सौर वीज विकण्यास मान्यता होती. आता मात्र पाच मेगावॉटपर्यंत मर्यादा वाढवली आहे. ही वीज पूर्णतः हरित असेल. त्यातून कारखान्यांची किमान ५-१० टक्के बचत झाली तरी तोटे कमी होतील, असा युक्तिवाद होत आहे.

साखर उद्योगाला सौरऊर्जा निर्मितीकडे नेण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे. धाराशिवमध्ये डॉ. आंबेडकर साखर कारखान्याने पाच मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प दहा एकर क्षेत्रात उभा केला आहे. परंतु सर्व साखर कारखान्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जागा व गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले तरच सौरऊर्जेची दालने साखर उद्योगाला उघडू शकतील.

- पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT