madhuri dixit and dr shriram nene sakal
पुणे

Suhana Sakal Swasthyam 2023 : एकमेकांना प्रोत्साहन देणे गरजेचे - माधुरी दीक्षित-नेने

‘वैवाहिक जीवनात नवरा आणि बायको या दोघांचेही जीवनातील ध्येय एकच असते. ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. परंतु ते दोन्ही मार्ग आयुष्याच्या एका टप्प्यावर एकत्र येतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘वैवाहिक जीवनात नवरा आणि बायको या दोघांचेही जीवनातील ध्येय एकच असते. ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. परंतु ते दोन्ही मार्ग आयुष्याच्या एका टप्प्यावर एकत्र येतात. त्यामुळे जबाबदाऱ्या लक्षात घेऊन कायम एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,’’ असे सांगत अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांनी नात्यातील हळवी गुंफण उलगडली. तर, ‘‘नाते वृद्धिंगत करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा’, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी दिला.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्‌’ सोहळ्यात पहिल्या दिवशी अभिनेत्री आणि निर्मात्या माधुरी दीक्षित-नेने आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांची मुलाखत झाली. नातेसंबंध, पालकत्व, निरोगी आरोग्य अशा विषयावर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. नातेसंबंधात एकमेकांवर अतूट विश्वास आणि आदर असायला हवा, असा सल्ला दोघांनी दिला. डॉ. नेने म्हणाले, ‘‘आम्ही एकमेकांच्या कुटुंबातील, व्यवसायातील भूमिकांचा, निर्णयांचा आदर करतो’.

‘पंचक’चा ‘टीझर’ प्रकाशित

अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि डॉ. श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्‌’ कार्यक्रमात पहिल्यांदा प्रकाशित केला. चित्रपटाबद्दल बोलताना माधुरी म्हणाल्या, ‘‘हा कौटुंबिक चित्रपट आहे. मनोरंजनातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

माझे आई-वडील दोघेही कोकणातील आहेत. त्यामुळे तेथील संस्कृती, भोवतालचा परिसर मला कायमच खुणावतो. म्हणूनच चित्रपटाचे चित्रीकरणही सावंतवाडीत करण्यात आले. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी यात काम केले आहे.’’ या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जयंत जठार, राहुल आवटे यांच्यासह कार्यकारी निर्माता नितीन प्रकाश वैद्य, चित्रपट समन्वयक डॉ. उमेश आजगावकर उपस्थित होते.

आयुष्यात थोडी शिस्त हवी : डॉ. नेने

आरोग्याबाबत बोलताना डॉ. नेने म्हणाले, ‘आयुष्यात थोडी शिस्त असायलाच हवी. स्वत:च्या आरोग्यासाठी आपण गुंतवणूक करायला हवी. आपल्या आरोग्यावर आत्तापासून काम केलेत; तर त्याचे परिणाम कदाचित लगेच दिसणार नाहीत. परंतु त्यामुळे तुमचे पुढील आयुष्य हे निरोगी होईल. वयाच्या तिशी-चाळीशीनंतर आरोग्याबाबत समस्या भेडसावतात. मी दररोज साधारणत: पाच शस्त्रक्रिया करतो, अशारीतीने वर्षातून जवळपास ५०० शस्त्रक्रिया होतात. परंतु जगातील सहा बिलियन लोकांपर्यंत उपचार पोचवायचे आहेत.’

मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे

‘प्रत्येक मूल हे अलौकिक बुद्धिमत्ता असलेले असते. त्यातील कलागुण, कौशल्य पालक म्हणून आपण ओळखायला हवीत आणि त्याची ओळख मुलांना करून द्यावी. मुले जे सर्वोत्कृष्ट करू शकतात, त्याला प्रोत्साहन द्यायला हवे,’’ असे माधुरी यांनी सांगितले. तर, डॉ. नेने म्हणाले, ‘‘आपल्या मुलांच्या रूपाने आपण पुढील पिढी घडवीत आहोत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे मुलांना घडविण्यासाठी वेळ द्यायला हवा.’

आपल्या जे मनापासून आवडते, ते मुलांनी करायला हवे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी मनापासून, प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने करा. अपयश आले तरी घाबरून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. आयुष्यात प्रत्येकाबद्दल आदर ठेवा.

- माधुरी दीक्षित-नेने, अभिनेत्री

डॉ. नेने यांनी दिलेला कानमंत्र

  • व्यायामाबरोबरच मानसिक आरोग्य, आहार यावर लक्ष देणे गरजेचे

  • मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करावी

  • आनंद देणाऱ्या गोष्टी करा

  • कौशल्य आणि आवड या दोन्हीकडे पाहायला हवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT