दिघी - येथील सुमन शिल्प सोसायटीतील सोलर पॅनेलच्या उपक्रमाची माहिती देताना पदाधिकारी. 
पुणे

पर्यावरणपूरक ‘सुमन शिल्प’ (व्हिडिओ)

संजय बेंडे

भोसरी - सोलर पॅनेल बसवून वीजबिलात प्रति महिना पन्नास हजारांची बचत, कचऱ्यापासून खतनिर्मिती आदी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणारी दिघी-परांडेनगरातील सुमन शिल्प सोसायटी आदर्श सोसायटी ठरली असून, ‘रेड डॉट’ मोहीम राबवून आरोग्याची काळजी घेणारी महापालिका हद्दीतील ही पहिलीच सोसायटी आहे.

सोसायटीने वर्षाच्या सुरवातीपासून ॲरोबिक खतनिर्मिती प्रकल्प राबविला. रोज निर्माण होणाऱ्या सुमारे शंभर किलो कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. आतापर्यंत ३० टन कचऱ्यापासून तीन टन खताची निर्मिती केली. खताचा वापर सोसायटीच्या बागेत लावलेल्या केळी, पेरू, पपई आदी फळझाडांसाठी करतात. सुरवातीला जवळील सदनिकाधारकांनी दुर्गंधीच्या भीतीने खत प्रयोगाला विरोध केला. मात्र, दुर्गंधी न येता खताबरोबर उत्पन्न मिळत असल्याने या प्रकल्पाची माहिती घेण्यास सुरवात केली. या प्रकल्पासाठी पालिकेचे सहायक आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजित गुमास्ते, आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमारे, राजू साबळे, शंकर घाटे यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प यशस्वितेसाठी सोसायटीचे डी. बी. शेळके, विकास जाधव, दीपक घाग, नितीन हांडे, सचिन कुंभार, पंकज कळसकर, मोहन राऊत, उमेश नागरगोजे, शंकर कंदले आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सोसायटीने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून पावसाचे पाणी विहिरीत साठवून ठेवले. त्यामुळे सोसायटी टॅंकरमुक्त झाली आहे. बागेतील झाडांना ठिबक सिंचनाने पुरवठा केला जातो. पक्ष्यांसाठी घरटे बांधून, त्यावर सदनिकाधारकांचे नाव लिहिले असून त्यांच्याद्वारे निगा राखली जात आहे. 

रोज १२० युनिट वीज
सोलर पॅनेलने रोज एकशे वीस युनिट विद्युत निर्मिती केली जात आहे. यामुळे सोसायटीला दर महिना पन्नास हजारांची बचत होत आहे. वीस लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला बॅंकेने अर्थसाहाय्य देण्यास असमर्थता दर्शविली. परंतु सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी सदनिकाधारकांकडूनच पैसे कर्ज रूपाने घेतले. त्यांना त्यांची रक्कम मिळेपर्यंत सोसायटी खर्च माफ केला.

रेड डॉट उपक्रम
घरातील सॅनेटरी नॅपकिन, डायपर आदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘रेड डॉट’च्या कागदी पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या कचरा वेचक न उघडता कचऱ्यात पाठवितात. हा प्रकल्प राबविणारी ही पहिलीच सोसायटी असल्याचे सहायक आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांनी सांगितले.

सर्वच हाउसिंग सोसायट्यांनी निर्माण होणारा कचरा जिरविण्यासाठी व त्यापासून उत्पन्न मिळविण्यासाठीचे प्रकल्प राबविल्यास शहरातील कचऱ्याची समस्या दूर होईल. यासाठी महापालिकेतर्फे मार्गदर्शन केले जाईल.
- प्रभाकर तावरे, सहायक आरोग्याधिकारी

दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात सोसायटीला महिन्याला सात ते आठ पाण्याचे टॅंकर लागायचे. त्यासाठी दरमहा ६०-७० हजार रुपये लागायचे. मात्र, रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे टॅंकरपासून मुक्त व पैशांचीही बचत झाली.
- देवराम शेळके, अध्यक्ष, सुमन शिल्प सोसायटी, फेज १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT