heatstroke sakal
पुणे

Summer : वाढत्या उन्हापासून सावधान! उष्माघाताचा होऊ शकतो त्रास

उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तीव्र उन्हात फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या. थकवा येणे, मळमळ होणे, ताप येणे असा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरु करावेत असे आवाहन महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी केले आहे.

उष्माघाताची कारणे -

- उन्हात शारीरिक श्रमाची, कष्टाची कामे करणे

- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे

- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे

- घट्ट कपड्यांचा वापर करणे

- वाढत्या तापमानाशी सतत संपर्क आल्यास उष्माघात होऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणे -

- मळमळ उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे

- ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे

- घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे

- रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था

अतिजोखमीच्या व्यक्ती -

- बालके, लहान मुले, खेळाडू,

- सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती,

- हृदयरोग, फुफ्फूसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असलेले व्यक्ती

प्रतिबंधात्मक उपाय -

- भर उन्हात जास्त वेळ कष्टाची कामे करणे टाळणे

- शक्य नसल्यास थोड्या वेळ सावलीत विश्रांती करून पुन्हा काम करावे

- कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावीत.२

- उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये.

- सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत.

- भरपूर पाणी प्यावे, बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे.

- लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.

- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्रीचा वापर करावा

- घरामध्ये कुलर, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे वापरावेत

- बंद वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याला सोडू नका.

- उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित दवाखान्यात जावे

उपचार -

- रुग्णास प्रथम सावलीत आणावे

- रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.

- रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत

- रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे

- चहा, कॉफी देऊ नये

- रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात

- थर्मामीटरने रुग्णाचे तापमान ३६.८ सेल्सिअसच्या खाली तापमान होईपर्यंत वरील उपचार करावेत

- रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका बोलवावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT