पुणे : स्वप्नांना दिशा देतानाच देशसेवा करण्याचा मिळालेला कानमंत्र, मनगटातील बळाचा सेवेसाठी उपयोग करण्याचा केलेला निर्धार, करिअर घडविताना सातत्याने नवीन शिकण्याचा तज्ज्ञांकडून मिळालेला सल्ला, याचा खुल्या मनाने स्वीकार करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन समर यूथ समिट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या तरुणाईच्या उत्सवाचा समारोप बुधवारी (ता. १२) झाला.
समारोपप्रसंगी ‘एआयएसएसएमएस’च्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, अर्थतज्ज्ञ सुरेश शेळके, अभिनेते अक्षय केळकर, अभिनेत्री गायत्री दातार, पायल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. या कार्यक्रमासाठी के. जे. कॉलेज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, महाएनजीओ फेडरेशन, ए.आय.एस.एस.एम. सोसायटी, एस.एस. मोबाईल्स, फ्रेमबॉक्स ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी डॉ. माने म्हणाले, ‘‘आपल्या समाजासाठी चांगले नेतृत्व तयार व्हावे, या उद्देशाने ‘यिन’ने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भविष्यात भारताचे नेतृत्व करणारे युवक तयार करण्याचे काम या माध्यमातून होत आहे. युवकांना आपल्यातील गुणांचे सादरीकरण करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमधील गुण पूर्णपणे विकसित होत असून ते परिपूर्ण बनत आहेत.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे आरव यांनी केले.
प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वत:ला एक ‘नेतृत्व’ म्हणून तयार करायला हवे. त्यासाठी स्वत:च्या पद्धतीने तयारी करा. नेतृत्व करण्यासाठी ध्येय ठरवा आणि त्या ध्येयापर्यंत पोचण्याची दिशा निश्चित करा. या दोनदिवसीय कार्यक्रमातून ऐकलेल्या गोष्टीतून शिका आणि पुढे जा. ‘यिन’च्या उपक्रमातून प्रेरणा घ्या आणि आपली पुढील वाटचाल यशस्वी करा.
- डॉ. प्रदीप माने, प्राचार्य, ‘एआयएसएसएमएस’च्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.