Driving License Sakal
पुणे

Pune RTO : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वाहन परवान्यांचा पुरवठा ठप्प

पुणे ‘आरटीओ’ कार्यालयात रोज सुमारे १५०० परवाने दिले जातात. यात दुचाकींसह अवजड वाहनांचा समावेश आहे. आरटीओला स्मार्टकार्डचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने अचानक तो थांबविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे ‘आरटीओ’ कार्यालयात रोज सुमारे १५०० परवाने दिले जातात. यात दुचाकींसह अवजड वाहनांचा समावेश आहे. आरटीओला स्मार्टकार्डचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने अचानक तो थांबविला आहे.

पुणे - तुम्ही वाहन चालक परवाना मिळण्यासाठी डिसेंबरमध्ये परीक्षा दिली आहे का? तुम्ही परवाना आला असल्याची टपाल कार्यालयात वारंवार चौकशी करत आहात का? तुमच्याबरोबर परीक्षा देणाऱ्याकडे परवाना मिळाल्याची चौकशी करत आहात का? तर हे सगळे खटाटोप आता थांबवा. कारण, प्रादेशिक परिवहन कार्यालयातच (आरटीओ) वाहनचालक परवाना वितरणाचे काम विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ३० हजार वाहनचालक परवान्याच्या प्रतीक्षेत अडकल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

पुणे ‘आरटीओ’ कार्यालयात रोज सुमारे १५०० परवाने दिले जातात. यात दुचाकींसह अवजड वाहनांचा समावेश आहे. आरटीओला स्मार्टकार्डचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने अचानक तो थांबविला आहे. त्याविषयी आरटीओ प्रशासनाला कोणतीही लेखी माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला.

मुलाखतीसाठी रिक्षाचालक प्रतीक्षेत

रिक्षाचालकांना कायमस्वरूपी (पर्मनंट) परवान्यासाठी मुलाखत द्यावी लागते. रोज पंधरा परवान्यांचा कोटा ठरवून दिला आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना मुलाखत घेण्यासाठी सुमारे दीड महिने प्रतीक्षेत आहेत. हा कोटा वाढविण्याची मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे.

या संदर्भात आरटीओची बाजू जाणून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी तो होऊ शकला नाही.

वाहनचालक परवान्यांची छपाई गेल्या महिनाभरापासूनच रखडली आहे. आता ‘आरटीओ’ कार्यालयात एकही कार्ड शिल्लक नाही. त्यामुळे वाहनचालकांना परवानाच देता येणार नाही, अशी माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर दिली.

वाहनचालक परवान्याच्या यंत्रणेत नेहमीच विस्कळीतपणा आलेला असतो. आता अनेक वाहनधारकांना दोन महिन्यांपासून परवाना मिळालेला नाही. यंत्रणेकडे चौकशी केली असता तो वितरित झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात मात्र तशी परिस्थिती नसते. हा सावळागोंधळ थांबायला हवा.

- कृष्णा दाभाडे, संचालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल

यंत्रणेतील दोषामुळे एकाच व्यक्तीला दोन वेळा परवाना मिळाला आहे, तर दुसरीकडे यंत्रणेत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. परवाना वाटपात अनियमितता आहे. यंत्रणेत दिसणारी व्यवस्था व प्रत्यक्षात परिस्थिती यात मोठी तफावत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसतो आहे.

- विठ्ठल मेहता, वाहनधारक

काय झाले?

वाहनचालक परवाना देण्यासाठी स्मार्टकार्ड आवश्यक असते. त्याचा पुरवठा एका कंपनीकडून केला जातो. पण संबंधित कंपनीने ‘आरटीओ’ला स्मार्टकार्डचा पुरवठा करण्याचे काम अचानक थांबविले. त्यामुळे हा परवाना देण्याची व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.

छापलेले परवाने कार्यालयातच पडून

वाहनचालक परवान्याची व्यवस्था गडगडली असतानाच यापूर्वी छापलेले परवाने टपाल कार्यालयापर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे पुणे ‘आरटीओ’ची वाहनचालक परवाना देणारी एकूण यंत्रणाच ‘नादुरुस्त’ झाली असून, त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा दिलेले वाहनचालक सध्या परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT